शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

बिबटय़ाच्या वास्तव्यामुळे मजूर भयग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 16:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : गेल्या दोन दिवसांपासून तळोदा तालुक्यातील बोरद व मोड शिवारात बिबटय़ाचे वास्तवळ असल्याने मजूर शेतात राबण्यास तयार होत नसल्याची स्थिती आह़े त्यामुळे शेतात कामासाठी मजूरच मिळत नसल्याने शेतक:यांसमोर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आह़ेबोरद येथे गुरुवारी सकाळी उसाच्या शेतात कृष्णदास काशीनाथ पाटील यांना बिबटय़ाचे दर्शन झाल़े ते आपल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : गेल्या दोन दिवसांपासून तळोदा तालुक्यातील बोरद व मोड शिवारात बिबटय़ाचे वास्तवळ असल्याने मजूर शेतात राबण्यास तयार होत नसल्याची स्थिती आह़े त्यामुळे शेतात कामासाठी मजूरच मिळत नसल्याने शेतक:यांसमोर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आह़ेबोरद येथे गुरुवारी सकाळी उसाच्या शेतात कृष्णदास काशीनाथ पाटील यांना बिबटय़ाचे दर्शन झाल़े ते आपल्या सबमर्शिबल पंप टय़ुबवेलमध्ये सोडत असतानाच बिबटय़ा एका वराहाच्या मागे धावत असल्याचे त्यांना दिसून आल़े यासोबत कृष्णदास पाटील यांच्यासोबत चार ते पाच मजूरदेखील होत़े बिबटय़ाचे दर्शन होताच त्यांनी हातातील काम सोडून गावाकडे पळ काढला़ प्रत्यक्षदर्शीनी बिबटय़ाला पाहिल्याने तो पूर्णपणे वयस्क असल्याचे दिसून आल़े बिबटय़ा दिसल्याचे ग्रामस्थांना समजताच काही ग्रामस्थांनी बिबटय़ा दिसला त्या ठिकाणी आगेकूच केली़ परंतु तोर्पयत तेथून बिबटय़ा पसार झाला होता़ बोरद-मोड  परिसर हा बिबटय़ाच्या अधिवासात मोडत असल्याने या ठिकाणी अनेक वेळा बिबटय़ा दिसून येत असतो़ परंतु यामुळे येथील शेतकरी व मजुरांमध्ये मोठय़ा प्रमाणात भितीचे वातावरण निर्माण झाले         आह़ेकधी बिबटय़ा स्वता तर त्याचे बछडे दिसून येत असल्याने अजून किती बिबटे या परिसरात आहे याची माहिती नाही़ याबाबत वनविभागाकडेही माहिती नसल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले            आह़े ़़आणि बिबटय़ाचे झाले दर्शनमोड परिसरात सध्या उसतोड अंतीम टप्प्यात आह़े कारखानदार व खांडसरींच्या कामगारांच्या माध्यमातून या ठिकाणी उसतोड करण्यात येत आह़े बुधवारी सकाळी मजूर उसतोडीसाठी शेतात गेले असता उसाच्या आडोशाला बिबटय़ा शांत झोपलेला असल्याचे मजुरांना दिसून आल़े त्या वेळी मजुरांचा चांगलाच थरकाप उडाला़ काडीचाही आवाज न करता त्या वेळी मजुरांनी आपली पावले माघारी वळवली होती़ अशा सततच्या घटनांमुळे  मजुरांमध्ये बिबटय़ाची चांगलीच दहशत निर्माण झालेली आह़े दरम्यान, ग्रामस्थांनी सांगितल्यानुसार येथील बिबटय़ा कुत्रा, वराह, कोंबडय़ा, बक:या आदी नैसर्गिक साखळीतील प्राण्यांचीच शिकार करीत आहेत़ आतार्पयत त्यांनी मनुष्यावर हल्ला केल्याचा प्रकार घडलेला नाही़ परंतु शेवटी जंगली प्राणी असल्याने तो मनुष्यावरही कधी काही हल्ला करु शकतो असे मत ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आले आह़े त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून वनविभागाने सापळा किवा जाळीच्या माध्यमातून येथील बिबटय़ांना जेरबंद करुन गावाच्या बाहेर सोडावे अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आह़े