शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील प्रयोगशाळेमुळे मदत होईल- ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर

By admin | Updated: June 22, 2017 16:32 IST

आगामी काळात अनेक प्रयोगशाळा पुढे येऊ शकतात़ त्यामुळे शेतक:यांना विविध पर्याय उपलब्ध होऊन, तंत्रज्ञान समजण्यास मदत होऊ शकेल, असे प्रतिपादन डॉ़ अनिल काकोडकर यांनी केल़े

 ऑनलाईन लोकमत

नंदुरबार,दि.22 : ग्रामीण भागातील रोपनिर्मिती प्रयोगशाळा लहान असली तरी, आगामी काळात एक नव्हे तर अनेक प्रयोगशाळा पुढे येऊ शकतात़ त्यामुळे शेतक:यांना विविध पर्याय उपलब्ध होऊन, तंत्रज्ञान समजण्यास मदत होऊ शकेल, असे प्रतिपादन परमाणू ऊर्जा आयोगाचे सदस्य व राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ़ अनिल काकोडकर यांनी केल़े 
केंद्रशासन अणुऊर्जा विभाग सामाजिक उपक्रमानुसार आकृती टेक कार्यक्रमांतर्गत केळी उतीसंवर्धित रोपनिर्मिती प्रयोगशाळेचा शुभारंभ कार्यक्रम डॉ़ काकोडकर यांच्या हस्ते करणखेडा ता़ नंदुरबार येथे झाला, यावेळी ते बोलत होत़े कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ़ मल्लीनाथ कलशेट्टी, राज्य विज्ञान तंत्रज्ञान आयोगाचे सदस्य डॉ़ गजानन डांगे, कृषी शास्त्रज्ञ विश्वास कुळकर्णी, स्मिता मुळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुभाष नागरे, आत्माचे प्रकल्प संचालक मधुकर पन्हाळे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी उमाकांत पाटील, हेडगेवार सेवा समितीचे अध्यक्ष कृष्णदास पाटील, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ राजेंद्र दहातोंडे उपस्थित होत़े 
डॉ़ काकोडकर म्हणाले की,  तंत्रज्ञानाविषयी जाणीव भोवतालच्या परिसरात वाढवण्यासाठी अशा प्रयोगशाळांचा उपयोग होऊ शकतो़ कुठलेही तंत्रज्ञान प्रयोगशाळेत विकसित झाल्यानंतर शेवटच्या घटकार्पयत पोहोचवण्यासाठी अनेक बाबी पार पाडाव्या लागतात़ यासाठी एक मध्यस्थी संस्था असणे आवश्यक असून या भागात काम करणा:या स्वयंसेवी संस्थांनी मध्यस्थाची भूमिका बजवावी जेणेकरून शेतक:यांना तंत्रज्ञान समजण्यास मदत होऊन, त्यांचा फायदा होईल़