शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
2
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
3
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
4
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
5
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
6
शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."
7
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात रेडिओ क्लब जेटी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा
8
"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO
9
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
10
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
11
समोसे, जिलेबीवर हानिकारक असल्याचे लेबल लावण्याची माहिती खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण
12
बड्या प्रोडक्शन हाऊसमध्ये...,'पंचायत' फेम अभिनेत्रीला आला कास्टिंग काऊचचा अनुभव
13
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
14
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
15
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण
16
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्का! भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरूच; अनेकांचा पक्षप्रवेश
17
ऑलिम्पिक क्रिकेटसाठी केवळ ६ संघांना संधी, कशी ठरणार पात्रता, कोण घेणार निर्णय? नीट समजून घ्या
18
शाळा सोडली, स्वप्न थांबली, पण हार नाही मानली; आव्हानांना तोंड देत पार पाडतेय कर्तव्य
19
धक्कादायक! 'पंचायत' फेम आसिफ खानला हृदयविकाराचा झटका, म्हणाला- "एका क्षणात सगळं बदललं..."
20
एक कोटी रुपये कमाई, तरीही तो दु:खी, सोशल मीडियावर मांडली व्यथा, म्हणाला, पैसा आहे पण...   

मजुरांच्या रिक्षाला अपघात, एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 12:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : धानोरा ते नंदुरबार रस्त्यावर पिंपळोद गावाचा शिवारातील वळणावर मिरची तोडण्यासाठी मजूर घेऊन जाणारी ॲपेरिक्षा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : धानोरा ते नंदुरबार रस्त्यावर पिंपळोद गावाचा शिवारातील वळणावर मिरची तोडण्यासाठी मजूर घेऊन जाणारी ॲपेरिक्षा उलटल्याने अपघात झाला. या अपघातात १ महिला ठार तर  ५ जण जखमी झाले. जखमींना  जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.वाहन चालक अमरसिंग जेमाभाई वळवी रा. गामडी, ता.निझर याच्या ताब्यातील ॲपेरिक्षा (क्र.जी.जे २६ टी ४०३६) रायगड ता. निझर गावातून पाचोराबारी ता. नंदुरबार येथे मिरची तोडण्यासाठी मंजुरीकरिता धानोरा मार्गे वाहन नेत असतांना पिंपळोद गावाच्या शिवारात वसंत पाटील यांचा शेता जवळील वळण रस्त्यावर सकाळी ८ वाजेच्या सुमारास पिंपळोळ गावाकडून येणारी दुचाकी अचानक ॲपेरिक्षाला धडकल्याने रिक्षा चालकाचा ताबा सुटला. ताबा सुटताच वाहन रस्त्याच्या पलीकडे उलटल्याने अपघात झाला. या अपघातात ॲपेरिक्षातील मजूर महिला सुनीता चंद्रसिंग वसावा (३०)  रा.रायगड ता. निझर ठार झाली. तर दिपीका वासू गावित,चंद्राबेन महेंद्र वसावा, कल्‍पना वासू गावित, राहुल कांतीलाल नाईक, विपेश वसंत वळवी सर्व रा.रायगड ता.निझर जखमी   झाले.अपघात झाल्यानंतर तात्काळ १०८ रुग्णवाहिकेतून जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले.त्याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार केले. घटनास्थळी उपनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाळासाहेब भापकर यांनी पाहणी केली. अपघात प्रकरणी विपेश वळवी यांनी उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानुसार, ॲपेरिक्षा चालक अमरसिंग जेमाभाई वळवी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उदयसिंग वळवी करीत आहेत.

जखमींमध्ये मुलींचाही समावेशजखमींमध्ये कामासाठी जाणाऱ्या लहान मुलींचा देखील समावेश होता. त्यामुळे जखमी झाल्यानंतर त्यांना होणाऱ्या वेदनांमुळे त्या विव्हळत होत्या. त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या नातेवाईक महिलांनी रुग्णवाहिका येईपर्यत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या तसेच पिंपळोद ग्रामस्थांनी देखील मदतीचा हात दिला. रुग्णवाहिका आल्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी व मयत हे गुजरात राज्यातील आहेत.