लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने आंतरराज्य वाहतुकीसह आंतरराष्ट्रीय पातळीवरही हवाई वाहतूक बंद केला आहे. त्याचा फटका जिल्ह्यातील केळी उत्पादकांना बसणार आहे. ३१ मार्चपर्यंत राज्यात संचारबंदी असल्याने या महिन्यात केळीची तोडणी झालेली नाही. एप्रिल महिन्यात परिस्थितीत सुधारणा होईलच याचीही शाश्वती नाही, त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडणार आहे. परिणामी आखाती देशात होणारी केळीची निर्यात संकटात सापडली आहे.शहादा तालुक्यातील केळी कोल्हापूर येथील धरती अॅग्रो तर गुजरातमधील देसाई अॅग्रो व एन. आय. ए. अॅग्रो या कंपन्यांच्या माध्यमातून देश व आंतरराष्टÑीय पातळीवर निर्यात होते. तालुक्यातील केळी उत्पादकशेतकरी नामांकित कंपन्यांच्या टिशू कल्चरद्वारे निर्मिती रोपांची लागवड करीत आहे. या कंपन्यांच्या माध्यमातून लागवड झाल्यानंतर खत देणे व किटकनाशक फवारणीसह वर्षभर विविध कामे या शेतकऱ्यांची पार पाडली. फळधारणा झाल्यानंतर केळीच्या घडाची देखभाल व निगा राखण्यात आली. फळाची लांबी व गोलाईनुसार केळीला परदेशात भाव मिळत असतो. यासाठी केळीचे बेचाळीस कॅलिबर गुणवत्ता आवश्यक असते.केळीच्या प्रत्येक फळात पाण्याचे प्रमाण आवश्यक असणे गरजेचे आहे. केळी तोडणीपासून परदेशात पोहोचेपर्यंत साधारणत: २० ते ४० दिवसांच्या कालावधी लागत असल्याने तेवढा काळ ते फळ टिकले पाहिजे तरच या निर्यातीतून शेतकºयाला उत्पन्न मिळते.साधारणत: मार्च महिन्यापासून केळी तोडणी सुरु झाली आहे. केंद्र व राज्य शासनाची कुठलीही मदत न घेता ब्राह्मणपुरी ता. शहादा येथील शेतकऱ्यांनी त्यांनी पिकवलेली केळी आखाती देशात निर्यात करून आदर्श निर्माण केला. विशेषत: सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावरील निर्यात आज व्यापक झाली आहे. यातून शेतकºयांना भरघोस उत्पन्न मिळत आहे.ब्राह्मणपुरी येथील संजय पाटील, विठ्ठल पाटील, रोहिदास पाटील, गोपाळ पाटील, जगन्नाथ पाटील, अनिल पाटील, अंशुमन पाटील आदी शेतकºयांनी गेल्या तीन वर्षात सर्वाधिक केळी आखाती देशात निर्यात करून शेतकºयांसमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. परंतु सद्यस्थिती निर्माण झालेल्या कोरोनाच्या नव्या संकटामुळे अवघ्या जिल्ह्यातील केळीची तोडणी बंद करण्यात आली आहे. पुढील महिन्यातही कोरोनाची परिस्थिती अशीच राहिल्यास केळी उत्पादकांचे मोठे नुकसान होण्याचर शक्यता नाकारता येत नाही.खाजगी कंपन्यांच्या माध्यमातून केळीची निर्यात केली जात आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या महिन्यात केळीची तोडणी झाली नाही. असे असले तरी आम्ही निर्यातदार कंपन्यांच्या संपर्कात आहे. दरम्यान एप्रिलनंतर कंपन्यांचे पदाधिकारी शेतकºयांशी चर्चा करीत पुढील निर्णय घेणार आहे. वर्षभर मेहनत करून उत्पादन घेतले आहे. याची निर्यात झाली नाही तर शेतकºयांना मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे.-अंशुमन पाटील, केळी उत्पादक, ब्राह्मणपुरी ता. शहादा
केळी निर्यातीला ‘कोराना’चा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 13:54 IST