लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहादा येथे किरकोळ वादातून एकावर चाकूहल्ला झाला. यात एकजण गंभीर जखमी झाला. याबाबत शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस सूत्रांनुसार, मंगलदास पानपाटील व रवींद्र रामराजे यांच्यात किरकोळ वाद झाला. वादाचे पर्यावसान मारहाणीत झाले. संतापाच्या भरात पानपाटील यांनी रामराजे यांच्यावर चाकूने वार केला. त्यात ते जखमी झाले. या झटापटीत पानपाटील हे देखील जखमी झाले.याबाबत शहादा पोलिसात पानपाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामराजे यांच्यावर खाजगी रुग्णालयात तर पानपाटील यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी पानपाटील यांना ताब्यात घेतले आहे.
शहाद्यात किरकोळ वादातून चाकूहल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 12:29 IST