लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही याचा राग येवून पतीने प}ीवर चाकूने वार करून जखमी केल्याची घटना नंदुरबारनजीक बिलाडी शिवारातील हॉटेलमध्ये घडली.भटू आनंदा माळी, रा.माळीवाडा, नंदुरबार असे संशयीत पतीचे नाव आहे. पोलीस सूत्रांनुसार, मोनिका भटू माळी या बिलाडी शिवारातील हॉटेलमध्ये पोळ्या लाटण्याचे काम करतात. त्यांचे पती भटू माळी यांना दारूचे व्यसन आहे. दारूसाठी त्यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांनी प}ी मोनिका यांच्याकडे हॉटेलमध्ये जावून पैशांची मागणी केली. परंतु प}ीने पैसे देण्यास नकार दिल्याने भटू माळी याने तेथे पडलेल्या भाजी कापण्याच्या चाकूने वार करून मोनिका यांना जखमी केले. तसेच शिविगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. मोनिका माळी यांनी फिर्याद दिल्याने भटू माळी यांच्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार भोये करीत आहे.
दारू पिण्यास पैसे न दिल्याने प}ीवर चाकूने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 12:15 IST