शहरं
Join us  
Trending Stories
1
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
2
"पैसे देणे होत नसेल, तर पत्नी माझ्या घरी आणून सोड"; व्याजाच्या पैशावरून त्रासाने संपवलं जीवन
3
ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं?
4
"हो मी पाकिस्तानी सैन्याचा एजंट होतो", तहव्वूर राणाने चौकशीमध्ये केले अनेक धक्कादायक गौप्यस्फोट
5
Crizac IPO Allotment Status: ६० पट सबस्क्रिप्शन, शेअर्स अलॉट झालेत का, कसं कराल चेक? GMP प्रीमिअमवर
6
फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा! 'पंचायत ५'ची अधिकृत घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार
7
खळबळजनक! दिवसाढवळ्या एका व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या
8
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली 'गोळी'
9
किती वाईट दिसतंय ते? अंकिता लोखंडेचा लूक पाहून चाहते शॉक; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
10
हाफिज सईद पाकिस्तानात नाही? नेमका कुठे लपून बसलाय तोयबाचा म्होरक्या? 'या' व्यक्तव्यांमधून मिळाले मोठे संकेत
11
हृदयद्रावक! ११ महिन्यांच्या मुलीने गमावले आई-वडील, आजी; झाली अनाथ, डोळे पाणावणारा Video
12
चातुर्मासातील पहिले भौम प्रदोष व्रत: ‘असे’ करा पूजन, महादेवांची अखंड कृपा; शुभच होईल!
13
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा ग्रॅज्युएट; तरीही करतोय फूड डिलिव्हरीचं काम, महिन्याला लाखोंची कमाई
14
५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली?
15
Chaturmas 2025 Rangoli: चातुर्मासात दारासमोर रोज दोन बोटं रांगोळी काढा आणि लक्ष्मीकृपा मिळवा!
16
सुपरहिट सिनेमांचा साक्षीदार 'फिल्मीस्तान स्टुडिओ' अखेर विकला; फिल्म इंडस्ट्री भावुक
17
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ५ मूलांक लकी, विविध लाभच लाभ; यश-प्रगती-भरभराट, स्वामी कल्याण करतील!
18
भयंकर! दरोडेखोरांनी घरात घुसून पत्नी, मुलांसमोर केली इंजिनिअरची हत्या; पैसे, दागिने घेऊन पसार
19
अमेरिका-चीन व्यापार युद्धात अंबानींची एन्ट्री? बीजिंगला जाणारे गॅस जहाज आता थेट भारतात!
20
कर्नाटकातील अथणीत कार-बसचा अपघात, चौघे ठार; कोल्हापूरहून देवदर्शन करून परतताना काळाचा घाला

लोकसंघर्षतर्फे किसान मुक्ती आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 13:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे ९ आॅगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी किसान ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे ९ आॅगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी किसान बचाव कॉपोर्रेट भगाव चा नारा देत देशव्यापी किसान आंदोलनाची हाक देण्यात आली होती़ यांतर्गत लोकसंघर्ष मोर्चातर्फे वतीने धडगांव, अक्कलकुवा, तळोदा आणि शहादा तालुक्यातील गावांमध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेवत आंदोलन करण्यात आले़आदिवासी गौरव दिनासोबत जल, जंगल, जमीन या नैसर्गिक संसाधानांवरचे हक्क राखण्यासाठी केंद्र शासनाने शेती व आदिवासींच्या विरोधात केलेल्या कायद्यातील बदलांचा निषेध यावेळी करण्यात आला़ शेतकऱ्यांची त्वरित कर्जमुक्ती करा, शेतीमालाला दीडपट हमीभाव द्या, शेतकरी व आदिवासींच्या विरोधातील काढलेले अध्यादेश तात्काळ मागे घ्या, शेतकºयांचे वीजबिल माफ करत वीज सुधारणा बिल २०२० मागे घ्या, डीझेल च्या किंमती कमी करा, कोरोना काळात शेतकरी व कष्टकरी वर्गाला पूर्ण रेशन, दुधाला हमीभाव आणि आदिवासींनी दाखल केलेले दावे त्वरीत निकाली काढून त्यांना शेतीचा अधिकार देण्याची मागणी करत तीव्र निदर्शने करण्यात आली़ तळोदा, धडगांव, अक्कलकुवा व शहादा तहसीलदार यांना सोमवारी निवेदन देण्यात येणार आहे़ आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य गणेश पराडके, मुकेश पावरा, नारायण पावरा , रामदास तडवी, काथ्या वसावे, अशोक पाडावी, रमेश नाईक, देवीसिंग वसावे, झीलाबाई वसावे, निशांत मगरे दिलवर पाडवी यांनी सहभाग नोंदवला़चारही तालुक्यातील गावागावात आदिवासी दिन कार्यक्रमासह निर्दशने करुन किसान मुक्ती आंदोलन करण्यात आले़ यावेळी शासनाने शेतीकडे गांभिर्याने पाहून शेतकºयांना समस्यांच्या गर्तेतून बाहेर काढावे, देशाची अर्थव्यवस्था ही शेतीशिवाय अपूर्ण असनू खºया अर्थाने राष्ट्राला आर्थिक महासत्ता म्हणून प्रगती करायची असेल तर शेतकरी हा त्यातील एक महत्वाचा घटक आहे हे विसरू नये़ किसान मुक्ती आंदोलनाची दखल शासनाने घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा असा इशारा देण्यात आला आहे़