प्रकाशा : शहादा तालुक्यातील अंकलेश्वर बराणपूर या महामार्गावर भराव करताना, मातीचा व मुरुमचा वापर करण्यात आल्याने, पावसाचे पाणी आल्यामुळे मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण होत आहे. या मार्गावर जड वाहनांची वर्दळ असल्याने थोडाही पाऊस आला, तर चिखलात वाहने अडकून मार्गावर वारंवार वाहनांच्या रांगा लागत आहेत. वारंवार वाहतुकीचा खोळंबा होत असल्याने, संबंधित अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.
कोळदा ते सेंधवा या महामार्गाचे काम सुरू असून, प्रकाशा ते शहादा मार्गावरील प्रकाशा ते डामरखेडा रस्त्यादरम्यान काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. तरी या मार्गावरील कोकणी माता मंदिराजवळ गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्याचे काम संथगतीने सुरू आहे. या ठिकाणी माती आणि मुरुमचा भराव करण्यात आल्यामुळे या रस्त्यावर पाऊस आला, तर चिखल होत आहे. या रस्त्यावर चिखल होत असल्याने दुचाकी घसरून पडणे, चारचाकी वाहनाचे चाके अडकून पडणे, तसेच अवजड वाहनांचे टायर चिखलमध्ये रुतण्यासारख्या घटना घडत आहेत.
प्रकाशा ते शहादा मार्गावरील प्रकाशा ते डामरखेडा रस्त्यादरम्यान काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने वांरवार वाहनाची रांगा लागत असल्याने वाहतूक पोलिसांची दमछाक हो. आहे. वाहनाच्या रांगा लागल्यामुळे दोन तासांपर्यंत अत्यावश्यक वाहतूक ठप्प राहत आहे. वाहनधारकांना वाहने या मार्गावरून जाताना तारेवरची कसरत करावी लागत असून, संबंधित अधिकारी बघ्याची भूमिका घेता का, असा प्रश्न उपस्थित हो. असून, तरी हा मार्ग अपघातप्रवण झाला असल्याने या भागात मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. रस्त्याची दुरुस्ती करावी किंवा एक बाजूने वाहतूक सुरू करावी, अशी मागणी वाहनधारकाकडून होत आहे.