येथील संगमेश्वर आणि अडभंगनाथ मंदिरावर जाण्यासाठी दोन रस्ते आहेत. एक आसारामजी बापू आश्रमाकडून, तर दुसरा मार्ग गावातून येतो. या दोन्ही मार्गावर घाणीचे साम्राज्य आहे. आश्रमाकडून येताना रस्त्याच्या मध्यभागी गटारीच्या पाण्याचे मोठे डबके साचले आहे. त्यातून भाविक व रहिवाशांना मार्ग काढावा लागतो. पुढे आल्यावरही घाणीचे साम्राज्य पसरले आहे. दुसरा मार्ग गावातून मच्छी बाजारमार्गे कुंभार खाचकडून येतो. या ठिकाणीही गटार तुंबून त्यातील दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर वाहते. त्यामुळे येथील रहिवासी व मंदिरावर जाणाऱ्या भाविकांना गटारीच्या पाण्यातून ये-जा करावी लागते. रस्त्यावरून वाहणाऱ्या या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे ये-जा करण्यास अडचण निर्माण होत असून, आरोग्यही धोक्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी उपाययोजना करून स्वच्छता करावी, अशी मागणी अंबालाल पांडू भोई व रहिवाशांनी केली आहे.
संगमेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर घाणीचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:33 IST