शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गम भागातील प्रश्नांवरुन जि़प़च्या सभेत खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 11:45 IST

स्थायीची सभा : ग्रामसेवकाच्या गैरहजेरीच्या तक्रारी

नंदुरबार : सातपुड्याच्या दुर्गम भागातील गावांच्या समस्यांवरुन जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत सदस्य आणि अधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी झाली़ रोषमाळ खुर्द आणि तीनसमाळ ता़ धडगाव येथील प्रश्नांवरुन सदस्यांनी अधिकाऱ्यांना प्रश्न विचारल्यानंतर योग्य ते उत्तर न मिळाल्याने नाराजी व्यक्त होत होती़जिल्हा परिषदेच्या सभागृहात गुरुवारी दुपारी ही सभा आयोजित करण्यात आली होती़ अध्यक्षस्थानी अध्यक्षा रजनी नाईक होत्या़ यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष सुहास नाईक, बांधकाम सभापती दत्तू चौरे, आरोग्य सभापती हिराबाई पाडवी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी उपस्थित होते़ प्रारंभी प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर पठारे यांनी सभेचे विषयवाचन केले़ प्रारंभी गडचिरोली येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली़ सभेत सदस्य रतन पाडवी यांनी तिनसमाळ येथे १ वर्षापासून कूपनलिका खोदून ठेवल्या असल्या तरी साहित्य बसवले गेलेले नसल्याचे सांगितले़ अधिकाºयांनी संबधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली़ यावर उत्तर देताना पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पी़टी़बडगुजर यांनी दुर्गम भागात ४० पैकी १६ कामे अपूर्ण असल्याची माहिती दिली़ संबधित ठेकेदार यांच्याकडून आठ दिवसात उर्वरित कामे करुन घेणार असल्याचे तसेच गौºयाचा बोदलापाडा आणि कुंडलचा गुगलमालपाडा येथे २६ एप्रिलपासून १ दिवसआड टँकरने पाणी पुरवठा केला जात असल्याची व तीनसमाळ येथे सोलरबेस योजनेतू मंजूरी मिळाल्याची माहिती दिली़दरम्यान रतन पाडवी यांनी तीनसमाळ येथे रस्ता अपूर्ण असल्याने बोअरची गाडी जाऊ शकत नसल्याची माहिती दिल्यानंतर उपस्थित अधिकारी उत्तर देऊ शकले नाहीत़सभेत पशुसंवर्धन विभाग २१ एप्रिलपासून लाडीखुर्गट प्रतिबंधक लसीकरण सुरु असल्याची माहिती पशुसंवर्धन अधिकारी डॉ़ उमेश पाटील यांनी दिली़ सभेत विविध ९ विषयांवर चर्चा करण्यात आली होती़ सभेत धडगाव तालुक्यातील रोषमाळ खुर्द ग्रामपंचायतीतील ग्रामसेवक गैरहजर राहण्याचा मुद्दा सदस्यांनी उचलून धरला होता़ याठिकाणी नियुक्त असलेले ग्रामविकास अधिकारी डी़डी़पाटील हे निधी खर्च करताना टाळाटाळ करणे, १४ व्या वित्त आयोगाचा निधी खर्च न करणे, पेसा व इतर निधी मधून विकास कामे न करणे, तसेच नर्मदा काठावरच्या २० गावांमध्ये पाणीटंचाई असतानाही उपाययोजना करत नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या़ सदस्य रतन पाडवी यांनी याबाबत रोषमाळच्या ग्रामस्थांनी दिलेले निवदेन घेऊन आले होते़ त्यांनी निवेदन उपस्थित अधिकाºयांसमोर ठेवतच प्रश्न मांडला़ संबधित ग्रामविकास अधिकारी हे १८ आॅगस्ट २०१८ पासून रजेवर असल्याने त्यांनी अतिरिक्त कार्यभार असलेल्या ग्रामविकास अधिकारी यांच्याकडेही पदभार सोपवलेला नसल्याने नाराजी व्यक्त केली़ यावर उत्तर देताना ग्रामविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर पठारे यांंनी डी़डी़पाटील यांच्या दप्तर व रोषमाळ खुर्द येथील कामाची तपासणी करण्याचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देणार असल्याची माहिती दिली़