शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

खापरनजीक 2।। लाखाची दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 16:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  पंजाब आणि मध्यप्रदेश बनावटीचा अवैध दारूचा साठा उत्पादन शुल्क विभागाने खापरनजीक जप्त केला. दोन ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  पंजाब आणि मध्यप्रदेश बनावटीचा अवैध दारूचा साठा उत्पादन शुल्क विभागाने खापरनजीक जप्त केला. दोन लाख 37 हजार रुपये किंमतीची दारू व अडीच लाखांचा ट्रक असा चार लाख 87 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक अंकलेश्वर-ब:हाणपूर महामार्गावर गस्त घालत असतांना शुक्रवारी रात्री पथकाला खापर नजीक संशयीत वाहन (क्रमांक एमएच 39-सी 7306) जातांना दिसले. पथकाने वाहन अडविण्याचा प्रय} केला असता चालक वाहन सोडून अंधारात पसार झाला. पथकाने वाहनाची तपासणी केली असता त्यात राज्यात विक्रीस प्रतिबंधीत असलेले मद्य आढळले. पंजाबमध्ये निर्मित मद्य होते. त्यात 48 खोक्यांमध्ये व्हिस्कीच्या दोन हजार 304 बाटल्या आढळल्या. याशिवाय मध्यप्रदेश राज्यात निर्मित बियरच्या टीनचे तीन खोके असा एकुण दोन लाख 37 हजार 600 रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. याशिवाय अडीच लाखांचा ट्रक असा एकुण चार लाख 87 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चालक पळून गेल्याने हा मद्यसाठा कुठून कुठे जात होता, कुणाच्या मालकीचा आहे याचा तपास पोलीस करीत आहेत. याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.  ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त प्रसाद सुव्रे, जिल्हा अधीक्षक मोहन वर्दे यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक प्रकाश गौडा, ए.देशमाने, दुय्यम निरिक्षक शैलेंद्र मराठे, मनोज संबोधी, अतुल शिंदे, जवान भूषण चौधरी, तुषार सोनवणे, निलेश शेळके, हितेश जेठे, भट्टाचार्य बागले, हेमंत पाटील, हंसराज चौधरी, धनराज पाटील, अजय रायते यांनी केली.