शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

खाकी वर्दीतील माणुसकीचे तळोद्यात घडले दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 15:13 IST

मदतीचा हात : मोठय़ा रकमेसह असलेल्या वृध्दास घरी पोहचवण्यास मदत

रमेशकुमार भाट । लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : पोलीस कर्मचारी विलास मगन पाटील यांच्या रुपात खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन तळोद्यात घडल़े 85 वर्षिय वयोवृध्द व्यक्तीसह त्यांच्या जवळ असलेली 2 लाख 70 हजार रुपयांची रोकड सुरक्षित घरी पोहचती करुन पाटील यांनी आपले कर्तव्य तर बजावलेच परंतु अद्याप माणुसकी शिल्लक असल्याची प्रचिती दिली़ दिवस शनिवाऱ वेळ होती दुपारी साडेबाराची़ स्टेट बँक ऑफ इंडियातून 85 वर्षीय कृष्णासा कलाल यांचे थरथरणारे पाय एक-एक पाय:या खाली उतरत होत़े डोळ्यात काहीशी असुरक्षितता तर मनात आपण घरार्पयत सुखरुप पोहचू ना.. अशी धाकधूक़ 50 रुपयांच्या नोटा असलेले तब्बल 2 लाख 70 हजारांचे बंडल धरलेले हात छातीपासून वेगळे होईनात़ तळोद्यातील वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचारी विकास पाटील हे  भरणा करण्यासाठी जात असता त्यांच्या नजरेत कृष्णासा कलाल हे पडल़े कलाल यांची कासावीस बघता ते काही अडचणीत तर नाहीत ना? असा प्रश्न विकास पाटील यांना पडला़ त्यांनी भरण्याचे काम टाळत कलाल यांची आस्तेवाईक विचारपुस केली़ कुठे राहतात, सोबत कोण आहे, कुठे जायचे आहे, आदी विचारपुस केल्यानंतर बाबा एकटेच असून भलीमोठी रक्कम हाती आह़े एकीकडे शहरात चोरी, लुटीच्या घटना घडत असताना कलाल यांना एकटे सोडणे बरोबर होणार नसल्याचे त्यांना कळून चूकल़े त्यामुळे त्यांनी समयसूचकता पाळत हाती असलेले काम सोडत, पहिले रकमेसह कलाल यांना त्यांचे वास्तव्य असलेल्या तळोद्यातील संत सावता माळी भवनाजवळ त्यांच्या घरी सोडल़े घरी पोहचल्यानंतर कृष्णसा कलाल यांचे डोळे पानावलेले होत़े कलाल यांचा मुलगा विलास कलाल यांनेही विकास पाटील यांचे आभार मानल़े कलाल यांनी केलेल्य कामगिरीबद्दल फौजदार यादव भदाणे, वाहतुक शाखेचे सहाय्यक फौजदार एस़एस़ मुन्शी यांनी विकास पाटील यांचा गौरव केला़