शहरं
Join us  
Trending Stories
1
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
2
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
3
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
4
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
5
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
6
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
7
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
8
याला म्हणतात ढासू स्टॉक...! पॉवर कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 30% नं वधारला; दिलाय 6500% चा बंपर परतावा, करतोय मालामाल
9
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
10
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
11
"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल
12
Maharashtra Municipal Election: मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
13
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
14
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
15
Astrology: नवीन वर्षात नवीन वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी २०२६ मधील तारखा आणि शुभ मुहूर्त 
16
Numerology: 'या' जन्मतारखेच्या मुलींमध्ये असतो कमालीचा आत्मविश्वास आणि सौंदर्याचा अहंकारही 
17
सोने-चांदी पुन्हा महागले! खरेदी करण्यापूर्वी २२ कॅरेट आणि २४ कॅरेटचे दर पाहा; आणखी भाव वाढणार?
18
Corona Vaccine : कोरोना लसीमुळे तरुणांचा होतो अचानक मृत्यू? AIIMS आणि ICMR च्या रिसर्चमधून मोठा खुलासा
19
'पप्पा बाहेरून घरात आले आणि आम्हा सगळ्यांना...'; कुटुंब उद्ध्वस्त, वाचलेल्या दोन चिमुकल्यांनी काय सांगितलं?
20
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
Daily Top 2Weekly Top 5

कवळीथ कालव्याने केले बंधारे व तलाव पुनजिर्वीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 11:27 IST

तीन दशकानंतर दुरुस्ती : शेतक:यांमध्ये समाधान, जिल्हाधिका:यांकडून पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : जलयुक्त शिवार अभियान, जेएनपीटी व आर्ट ऑफ लिव्हींग शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने कवळीथ वळण बंधा:यातून निघणारे कालवे पुजरुज्जीवीत करण्यात आल्याने सहा मोठे तलाव, 18 केटीवेअर बंधारे पूर्ण क्षमतेने भरल्याने शेतकरी व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.कवळीथ बंधा:यातून निघणारे कालव्याचे खोलीकरण, गाळ काढणे आदी कामे जलयुक्त शिवार अभियान, जेएनपीटी व आर्ट ऑफ लिव्हींग शहादा यांनी लोकसहभागातून राबविली. या कामामुळे हे कालवे दीड महिन्यापासून पूर्ण क्षमतेने वाहत आहेत. कवळीथ, सोनवल त.ह., आसूस, टेंभली, लोणखेडा, पुरुषोत्तमनगर, डोंगरगाव, कौठळ त.श., सोनवद, मोहिदे त.श.,           वरुळ-कानडी, शिरुड, वर्ढे-टेंभे,  ससदे या गावांच्या परिसरातील पाण्याची पातळी वाढल्याने बंद पडलेल्या कुपनलिका, विहिरी पुनरुज्जीवीत झाल्या आहेत. या कालव्यामुळे सहा मोठे तलाव, 18 केटीवेअर बंधारे पूर्ण क्षमतेने प्रथमच भरले असून आर्ट  ऑफ लिव्हींगच्या कामामुळे ग्रामस्थ व शेतक:यांच्या चेह:यावर समाधान पहावयास मिळत आहे. जिल्हाधिकारी  डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, शहादा आर्ट ऑफ लिव्हींगचे किशोर पाटील, पाटबंधारे विभागाचे पी.जी. पाटील यांनी परिसरातील शेतक:यांसोबत वरुळ-कानडी, वर्ढे-टेंभे, शिरुड येथील कालव्यांना भेट देऊन पाहणी केली. शिरुड, वर्ढे-टेंभे येथील शेतक:यांनी स्वखर्चाने एक ते दीड किलोमीटर कालव्यातील गाळ काढून त्यांच्या शेतार्पयत पाणी नेले व 50 ते 60 हेक्टर कापूस, मका पिकांना जीवदान दिले.या वेळी शिरुड येथील माणक पाटील यांनी सांगितले की, या भागात  कालव्याच्या कामामुळे 65 वर्षात प्रथमच कालव्याचे पाणी आल्याने सर्वसाधारण शेतक:यांच्या शेतीसाठी पाणी उपलब्ध झाले आहे. कुपनलिका पुनरुज्जीवीत झाल्या असून दोन पाझर तलाव भरले गेले. विहिरींनाही 10 फुटावर पाणी आल्याने आम्ही शेतकरी आनंदी व समाधानी असून जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, आर्ट ऑफ लिव्हींगचे किशोर पाटील, हरिश पाटील, पाटबंधारे विभागाचे पी.जी. पाटील यांचे शेतक:यांच्या वतीने त्यांनी आभार मानले.