शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अवाढव्य प्रभागातील ‘काटे की टक्कर’ : नंदुरबार पालिका निवडणूक

By मनोज.आत्माराम.शेलार | Updated: December 11, 2017 12:40 IST

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सर्वाधिक व्याप्ती असलेल्या, सर्वाधिक मतदारसंख्या असलेला आणि दोन ऐवजी तीन नगरसेवक निवडून देणा:या प्रभाग क्रमांक 19 मधील तिन्ही जागेवरील लढती लक्षवेधी ठरल्या आहेत. सर्वाच्या नजरा असलेल्या क जागेवरील काँग्रेसचे कैलास पाटील आणि भाजपचे ईश्वर चौधरी यांच्यातील लढत प्रतिष्ठेची राहणार आहे.शहरातील 19 प्रभागांपैकी 18 प्रभागांमध्ये ...

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सर्वाधिक व्याप्ती असलेल्या, सर्वाधिक मतदारसंख्या असलेला आणि दोन ऐवजी तीन नगरसेवक निवडून देणा:या प्रभाग क्रमांक 19 मधील तिन्ही जागेवरील लढती लक्षवेधी ठरल्या आहेत. सर्वाच्या नजरा असलेल्या क जागेवरील काँग्रेसचे कैलास पाटील आणि भाजपचे ईश्वर चौधरी यांच्यातील लढत प्रतिष्ठेची राहणार आहे.शहरातील 19 प्रभागांपैकी 18 प्रभागांमध्ये प्रत्येकी दोन नगरसेवक निवडून देण्यात येणार आहेत तर केवळ एकमेव 19 क्रमांकाच्या प्रभागात तीन नगरसेवकांना निवडून दिले जाणार आहे. असा हा प्रभाग शहरातील सर्वात मोठा आहे. त्यामुळे उमेदवारांना प्रचार करतांना मोठी मेहनत घ्यावी लागत आहे. तब्बल सात हजार 443 मतदार असलेल्या या प्रभागात तीन हजार 805 पुरुष तर तीन हजार 638 महिला मतदार आहेत. अवाढव्य प्रभाग प्रभागाची व्याप्ती मोठा मारूती मंदीरापासून धुळे रस्त्याने धुळे चौफुली, वळण रस्त्याने जानता राजा चौक ते थेट तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या कुंपनाच्या भिंतीर्पयत तेथून थेट शहर हद्दीने वाघेश्वरी मंदीराच्या पायथ्यार्पयत तेथून धुळे रस्त्याने कृषी महाविद्यालयार्पयत तेथून निलेश लॉन्सपासून भोणे रस्त्यावरील फरशीर्पयत तेथून थेट धुळे चौफुली, कोकणीहिल, कामनाथ महादेव मंदीर, संजय नगर, बुस्टर पंप, गवळीवाडाची सिमा आणि तेथून परत मोठा मारुती मंदीरार्पयत असा हा प्रभाग आहे.विकास आणि कामेया प्रभाग क जागेवर विद्यमान नगरसेविका वंदना पाटील यांचे पती कैलास पाटील व विद्यमान नगरसेवक ईश्वर जयराम चौधरी यांच्यातील लढत प्रतिष्ठेची ठरली आहे. दोन्ही जणांनी नगरसेवक असतांना केलेली कामे ही त्यांची जमेची बाजू आहे. कैलास पाटील हे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे निष्ठावान असल्यामुळे त्यांनी कामांचा सपाटा लावला होता. याशिवाय सामाजिक कार्यात देखील ते अग्रेसर आहेत. कुणबी पाटील युवा मंचचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी अनेक सामाजिक कार्य या भागात केली आहेत. शिवाय प्रभागातील समाज आणि नातेगोते त्यांच्या कामी येणार आहे. युवा फौज देखील त्यांच्या मागे मोठी आहे. ईश्वर चौधरी यांनी देखील आपल्या परीने गेल्या पाच वर्षात या भागात जास्तीत जास्त कामे करण्याचा प्रय} केला आहे. आपल्या स्वभावाच्या बळावर नागरिकांची पालिकेतीलच नव्हे तर वीज मंडळ, महसूल विभागाची कामे देखील करवून देत समस्या सोडविल्या आहेत. दोन महिला जागाया प्रभागात दोन जागा या महिलांसाठी राखीव आहेत. काँग्रेसतर्फे एका जागेवर विद्यमान नगरसेविका आणि काँग्रेसचे पदाधिकारी मोहितसिंग राजपूत  यांच्या आई भारतीबाई अशोक राजपूत तर दुस:या जागेवर युवा कार्यकर्ते अविनाश माळी यांच्या    आई मंगलाबाई माळी या उमेदवार आहेत.  भारतीबाई राजपूत यांच्या विरोधात भाजपतर्फे सोनल राकेश पाटील तर मंगलाबाई माळी यांच्या विरोधात रेखा सुरेश माळी या रिंगणात आहेत. अविनाश माळी यांनी युवक संघटनेच्या माध्यमातून या भागातील सामाजिक कामे मोठय़ा प्रमाणावर केलेली आहेत. त्यामुळे युवकवर्गाची साथ त्यांना मिळणार आहे. मोहितसिंग राजपूत हे नंदुरबार लोकसभा काँग्रेस युवा आघाडीचे अध्यक्ष असून त्यांचे वडिल अशोक राजपूत हे देखील जनसामान्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर परिचित आहेत. त्यामुळे त्याचा फायदा अनुक्रमे मंगलाबाई माळी व भारतीबाई राजपूत यांना मिळण्याची आशा   आहे. भाजपच्या रेखा माळी यांचे पती सुरेश माळी हे शिक्षण क्षेत्रातील नावाजलेले व्यक्तीमत्त्व आहे. अनेक वर्ष ते जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष होते. त्यामुळे ते या भागात परिचित आहेत. सोनल राकेश   पाटील यांचे पती राकेश पाटील हे देखील सामाजिक कार्यात अग्रेसर असतात.जात-समाज आणि नातेगोतेप्रभागात जात-समाज आणि नातेगोते हे देखील प्रभावी ठरणार आहे. मराठा-पाटील समाज तब्बल दोन हजारापेक्षा अधीक आहे. त्या खालोखाल माळी समाज 430, राजपूत समाज 400, आदिवासी समाज 450, चौधरी समाज 350 आणि अनुसूचित जातीचे जवळपास 250 मतदारांसह इतर समाजाचे देखील मतदार या प्रभागात आहेत. मराठा-पाटील समाजाचे मतदान कसे फिरते त्यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे.