शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

१६ मोटारसायकली चोरणारा भामटा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 12:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्यासह शेजारील गुजरात राज्यातून मोटारसायकली आणि चारचाकी वाहन चोरी करणाऱ्या भामट्यास एलसीबीच्या पथकाने तळोद्यातून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्यासह शेजारील गुजरात राज्यातून मोटारसायकली आणि चारचाकी वाहन चोरी करणाऱ्या भामट्यास एलसीबीच्या पथकाने तळोद्यातून ताब्यात घेतले़ सोमवारी दुपारी झालेल्या य कारवाईनंतर चोरट्याने कबुली जबाब दिल्यानंतर १६ दुचाकी आणि एक चारचाकी चोरीचा गुन्हा उघडकीस आला़तळोदा बसस्थानक परिसरात एक जण विनानंबर दुचाकी अत्यंत कमी किंमतीत विक्रीचा प्रयत्न करत असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली होती़ त्यानुसार पथकाने याठिकाणी पाहणी केली असता, चहाच्या टपरीवर संशयित महागडी मोटारसायलकर विक्री करण्याच्या प्रयत्नात दिसून आला़ कर्मचारी त्याच्या जवळ जात असताना पोलीस आल्याचे समजून आल्यानंतर त्याने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला़ संशयिताचा पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले असता, राजू असे खोटे नाव सांगून उडवाउडवीची उत्तरे दिली़ त्याची चौकशी केली असता, त्याने खोजल्या वण्या तडवी रा़ बिजरीगव्हाण ता़ अक्कलकुवा अशी ओळख सांगून धक्कादायक माहिती दिली़खोजल्या याने गेल्या सहा महिन्यात नंदुरबार शहरातून एक, शहादा येथून दोन, नवापुरातून १, धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथून २ तर सारंगखेडा ता़ शहादा येथून बुलेट मोटारसायकल चोरी करुन आणली होती़ याच काळात गुजरात राज्यातील अंकलेश्वर, व्यारा, मांडवी, सुरत येथूनही दुचाकी चोरी करुन आणल्याची कबुली त्याच्याकडून देण्यात आली़ नंदुरबार, दोंडाईचा, शिरपूर आणि गुजरात राज्यातील मांडवी येथून दुचाकी चोरी करताना त्याला संदीप सुनील ठाकरे रा़ ख्वाजा मिया चौक याने साथ दिली होती़ त्यालाही पथकाने ताब्यात घेतले आहे़दोघांना पथकाने ताब्यात घेत नंदुरबार येथे आणून दुचाकी व चारचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणून मुद्देमाल जप्तीची कारवाई केली आहे़ ही कामागिरी पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस कॉन्स्टेबल मुकेश तावडे, पोलीस नाईक सुनील पाडवी, जितेंद्र अहिरराव, युवराज चव्हाण, मोहन ढमढेरे, सतीष घुले यांच्या पथकाने केली़ त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे़खोजल्या तडवी याने जळगाव शहरात चोरी करुन तेथून चारचाकी गाडी चोरुन आणली होती़ यासह जळगावातून त्याने तीन दुचाकी चोरी केल्या होत्या़ तळोदा तालुक्यातील कुंडलेश्वर मंदिर परिसरात सध्या तो राहत असल्याची माहिती देण्यात आली आहे़ दोघांकडून ताब्यात घेण्यात आलेली वाहने उपनगर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली असून ओळख पटवून संबधित मालकांनी ती घेऊन जाण्याचे कळवण्यात आले आहे़ दरम्यान ७ लाख ८० हजार रुपये किमतीच्या मोटारसायकली आणि चारचाकी वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आणून दोघांना अटक करणाºया एलसीबीच्या पथकाला पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी रोख बक्षिस दिले आहे़ जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या वाढलेल्या घटना लक्षात घेता एलसीबीकडून पथकांची निर्मिती करुन गुन्हेगारांचा शोध घेतला जात असल्याची माहिती देण्यात आली आहे़