लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट देणा:या माता-भगिनींची सुरक्षा करण्यासाठी महिला पोलीस व होमागार्ड यांची नियुक्ती केली आह़े 12 तास डय़ूटी करणा:या या भगिनींच्याही घरी बाप्पाचे आगमन झाले असून तेथील जबाबदारी पार पाडून त्या येथील सुरक्षेचे कर्तव्य बजावत आहेत़ शहरातील श्रीमंत बाबा, श्रीमंत दादा, महाराणा प्रतापसिंह युवक मंडळ, शक्तीसागर यासह विविध ठिकाणच्या सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेश मूर्तीची स्थापना व आरास केली आह़े यातून याठिकाणी वाढती गर्दी लक्षात घेता सुरक्षा उपाय म्हणून दोन पुरुष, दोन महिला आणि दोन महिला व पुरुष होमगार्ड यांचे पथक नियुक्त केले गेले आहेत़ यातील बहुतांश हे नंदुरबार आणि परिसरातील रहिवासी आहेत़ बहुतांश पुरुष आणि महिला कर्मचा:यांच्या घरी बाप्पाचा उत्सव मोठय़ा भक्तीभावाने साजरा करण्यात येतो़ उत्सवात सकाळी 9 ते रात्री किमान 11 या काळात कर्तव्य बजावणा:या महिला पोलीस व होमगार्डला तारेवरची कसरत करावी लागत़े यावेळी त्यांच्यासोबत संवाद साधला असता, त्यांनी कर्तव्य महत्त्वाचे आह़े घरासाठी सकाळी लवकर उठून आरती, पूजन, स्वच्छतेची कामे करत असल्याचे सांगितल़े कुटूंबियांनाही डय़ूटीवर जाण्याची वेळ माहिती असल्याने त्यांच्याकडून सर्वतोपरी मदत केली जात़े यातून 12 तास केलेल्या कामाचा थकवा कुठल्याकुठे निघून जात असल्याचेही महिला पोलीस कर्मचारींनी सांगितल़े
12 तासांच्या कर्तव्यापूर्वी घरच्या बाप्पासाठी अवघे दोन क्षणही पुरेसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 12:18 IST