शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

जिभाऊ एकांकिका राज्य स्पर्धेत रंगमंचावरून कलावंतांचे उपस्थितांच्या मनावर राज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 12:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिभाऊ एकांकिका राज्यस्तरीय स्पर्धेत अंत्यत मार्मिक, विनोदी अशा विविध भूमिका करण्यात आल्या. त्यातून एकांकिकांमधून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिभाऊ एकांकिका राज्यस्तरीय स्पर्धेत अंत्यत मार्मिक, विनोदी अशा विविध भूमिका करण्यात आल्या. त्यातून एकांकिकांमधून काही कलाकारांनी उपस्थितांची मने जिंकली.धिट भूमिकाजळगाव जनता बॅँकेच्या कलापथकामार्फत सादर ‘एका तपासाची गोष्ट’ या एकांकिकेतील राणीसाहेब हे पात्र खमके दाखविण्यात आले. राणीसाहेबांनी काही भूमिका अत्यंत विनोदी भूमिका केली. त्यांच्या या भूमिकेने उपस्थितांचे मनोरंजनही झाले होते. याशिवाय या एकांकिकेतील शांताबाई, प्रधानांची बायको शिपाई यांनी देखील नाट्यरसिंकांच्या मनावर राज केले.शांत परंतु निणार्यकजळगाव येथील डॉ.हेमंत कुलकर्णी अ‍ॅण्ड समुह या नाट्यसंस्थेमार्फत सादर करण्यात आलेल्या ‘अरण्य’ या एकांकिकेतील शामा हे पात्र अत्यंत शांत परंतु निर्णायक भूमिका घेत होता. तो घरमालकाची सेवा करीत असतानानाही मालकाला काही निर्णय घेतांना आधी शामाचे मत जाणून घेत होता. त्यामुळे घरात शामाच्या निर्णयाला विशेष महत्व दिले गेले. त्यामुळे या भूमिकेनेही लक्ष वेधले.परिस्थितीवर मात‘अरण्य’ याच नाट्यप्रयोगात प्रमुख भूमिका करणाऱ्या विठ्ठलने त्याच्यावर व्यंगत्व ओढवते. मूल होत नसल्यामुळे पत्नी त्याला सोडून जात असल्याचाही भाग दाखविण्यात आला. या भागात विठ्ठल हा एकाकी पडला असतानाही काही बाबींवर मात करत असल्याचे दाखविण्यात आले. या नाट्यप्रयोगाचा हा भाग समाजाला प्रेरणादायी ठरला.भगिनींचे वाढवले मनोबलइंदौर येथील रंगायन संस्थेमार्फत सादर करण्यात आलेल्या ‘मजार’या एकांकिततील गीता या प्रात्राने नाट्यरसिकांचे लक्ष वेधून घेतले. या नाटकातील गीता ही मोठ्या संकटात सापडली होती. तिला सीमावर्ती भागात सैनिकांकडून आधार मिळाला. परंतु तेथेही काहिशा तशाच प्रसंगाला सामोरे जावे लागले. परंतु गीता ही धिट राहून समोरिल व्यक्तीच्या आईचा विषय काढत त्या परिस्थितीवर मात करते. यातून उपस्थित भगिनींमध्ये मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला.