शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

नवापुरात उभ्या कारवर जीप आदळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 12:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : शहर हद्दीत  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर उभ्या असलेल्या कारला भरधाव वेगात जाणा:या जीपने धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. अपघातानंतर जीपचालक फरार झाला आहे. पोलीस सुत्रानूसार, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास छत्तीसगड राज्यातील देवानंद मुकाइ रात्रे यांनी आपली कार (क्रमांक ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : शहर हद्दीत  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर उभ्या असलेल्या कारला भरधाव वेगात जाणा:या जीपने धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. अपघातानंतर जीपचालक फरार झाला आहे. पोलीस सुत्रानूसार, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास छत्तीसगड राज्यातील देवानंद मुकाइ रात्रे यांनी आपली कार (क्रमांक सीजी 04-एलएस 8000) स्वस्तिक पेट्रोल पंपाजवळ उभी केली होती. त्याच बाजुला एक ट्रक देखील उभा होता. सुरतेकडून भरधाव वेगात धुळे कडे जाणा:या जीप चालकाने  (एमएच 39-डब्ल्यू 166) विरुध्द बाजुने आपले वाहन चालविल्याने जीप देवानंद रात्रे यांच्या उभ्या असलेल्या कारवर आदळली. कारला जोरदार धडक बसल्याने कार जवळच्या ट्रकवर आदळुन मागे आली. त्यात कार व ट्रकच्या मधे उभे असलेले कलीम मोहीयोद्दीन शेख रा. इस्लामपुरा नवापूर हे ट्रकवर व नंतर कारवर आदळले गेल्याने गंभीर जखमी झाले. तेथे उपस्थित नागरिकांनी त्यांना उप जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथून पुढील उपचारासाठी त्यांना व्यारा येथे हलविण्यात आले. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर जीप चालकाने पळ काढला असुन तो फरार झाला आहे. देवानंद रात्रे यांच्या फिर्यादीवरुन जीप चालक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलीस त्याचा शोध घेत आहेत.