शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

तोरणमाळ येथे जटाधारी साधूंची मांदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 13:15 IST

राधेश्याम कुलथे । लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ ता़ धडगाव येथे ...

राधेश्याम कुलथे ।लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ ता़ धडगाव येथे गुरू गोरक्षनाथ महाराजांच्या यात्रोत्सवाला शुक्रवारी सुरुवात होत आहे़ या पार्श्वभूमीवर याठिकाणी जटाधारी साधूंनी उपस्थिती दिली असून भाविकांची पावलेही तोरणमाळकडे वळू लागली आहेत़सातपुड्याच्या डोंगररांगात असलेले तोरणमाळ हे प्रेक्षणीय स्थळांसोबत गुरु गोरक्षनाथ महाराज यांच्या मंदिरांसाठी ओळखले जाते़ नाथ संप्रदायाच्या भाविकांसाठी पवित्र स्थळ असलेल्या तोरणमाळ येथे दरवर्षी महाशिवरात्रीला यात्रोत्सवाची दीर्घ परंपरा आहे़ या यात्रोत्सवात महाराष्ट्र, गुजरात आणि मध्यप्रदेशातील किमान १ लाख भाविकांची हजेरी लागते़ होलिकोत्सवाच्या काही दिवस आधी सुरु होणाºया या यात्रोत्सवाचे तीनराज्यात विशेष महत्त्व असल्याने येथे भाविक हजेरी लावून महाप्रसादाचा आनंद घेतात़तीन दिवस सुरु राहणाºया या यात्रोत्सवात प्रामुख्याने गोरक्षनाथ महाराज मंदिर, मंच्छिंद्रनाथ महाराजांची गुफा यासह विविध ठिकाणच्या मंदिरांमध्ये दर्शन घेत भाविक येथील कमल तलाव, यशवंत तलाव या परिसरात भेटी देतात़ यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारपासूनच भाविकांची मंदिरात गर्दी झाल्याचे दिसून येत होते़ गोरक्षनाथ महाराज हे नवसाला पावत असल्याची आदिवासी बांधवांमध्ये ख्याती असल्याने याठिकाणी विविध नवसपूर्तीच्या सोहळ्यांना गुरुवारीच प्रारंभ झाल्याचे दिसून आले़ दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याने म्हसावद येथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़

 

महाशिवरात्रीला तीन राज्यातून येणारे भाविक सोबत पीठ आणतात़ हे पीठ संकलित करुन त्याचा महाप्रसाद तयार करण्याची परंपरा आणि पाढंऱ्या शुभ्र कापडात गुंडाळून तयार होणारा हा सवा मणाचा रोडगा भाविकांना महाप्रसाद म्हणून वाटप करण्याचा पारंपरिक उपक्रम सकाळपासून सुरु होतो़ शुभ्र कापडात गुंडाळून केवळ विस्तवावर केवळ कणिक भाजले जाते़ परंतू कापड मात्र जळत नसल्याचे अनोखे दृश्य येथे नजेरस पडते़ प्रसादाचे वाटप पहाटेच्या सुमारास करण्यात येत असल्याने त्यासाठी भाविका रांगा लावून थांबनू असता़ ज्याला प्रसाद मिळाला त्याची यात्रा सफल झाली अशी मान्यता असल्याने हा प्रसाद घेण्याची चढाओढच भाविकांमध्ये असते़ दरम्यान रोडगा भाजल्यानंतर अग्नीकुंडातील राख गोळा करुन घरी भाविक घरी घेऊन जातात़