शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

चालकानेच रचला दरोडय़ाचा कट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 12:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : गाडी अडवून डोळ्यात मिरची पावडर फेकून पाच ते सहा जणांनी मारहाण करीत एक लाख ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : गाडी अडवून डोळ्यात मिरची पावडर फेकून पाच ते सहा जणांनी मारहाण करीत एक लाख 21 हजार रुपये जबरीने हिसकावून नेल्याची माहिती वाहन चालकाने त्याच्या मालकाद्वारे पोलिसांना कळविल्याने पोलीस तात्काळ घटनास्थळी  पोहोचले. मात्र घटनास्थळाच्या परिस्थितीवरून पोलिसांना ही घटना बनावट असल्याचा संशय आल्याने चालकाला पोलीसी खाक्या दाखवताच त्याने घटनेचे सत्य उलगडले. चालकानेच हा बनावट दरोडा घडवून आणल्याचे उघडकीस आले.पोलीस सूत्रानुसार, टेंभा-शिरुड रस्त्यावर 22 ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी वाहन चालक अजरुन संतोष पाडवी (रा.शहादा) व त्याच्या सहा साथीदारांना गजाआड केले आहे. शहादा येथील बालाजी वेफर्सचे मालक अमित मोतीलाल जैन यांच्याकडे टेम्पो (क्रमांक एम.एच.39 - 8718) या वाहनावर अजरुन संतोष पाडवी हा चालक म्हणून कार्यरत आहे. 22 ऑगस्ट रोजी अजरुन पाडवी टेंभा येथे वेफर्स पोहोचविण्यासाठी मदतनीस योगेश माळी यांच्यासह गेला होता. त्याच्याजवळ एक लाख 21 हजार रुपये रोख जमा झाले होते. ही रक्कम घेऊन तो रात्री साडेआठ वाजता तालुक्यातील टेंभा-शिरुड रस्त्याने येत असताना पाच ते  सहा जणांनी त्याचे वाहन अडवित वाहनाच्या काचा फोडल्या तसेच त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून त्यांना मारहाण करुन पाडवी याच्याजवळ असलेली एक लाख 21 हजार रुपये जबरीने हिसकावून नेत तेथून अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार झाले, अशी माहिती संतोष पाडवी याने मालक अमित जैन यांना दिली. जैन यांनी तात्काळ पोलिसांना घटना कळविली. पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बडगुजर, हवालदार जलाल शेख, मनोज सरदार, विकास कापुरे, दीपक भोई, स्वप्नील गोसावी, महेंद्र ठाकूर, देवा गावीत, दीपक फुलपगारे, नानाभाऊ ठाकरे यांनी घटनास्थळी धाव घेतली.  त्यांनी परिसरात आरोपींचा शोध घेण्याचा प्रय} केला. मात्र आरोपी मिळून आले नाही व टेम्पो रस्त्याच्या बाजूला उभा असल्याचे दिसले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता चालकाने सांगितलेली हकीकत व परिस्थितीजन्य पुरावे पाहून ही घटनाच बनावट असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यांनी चालक पाडवी यास पोलीस ठाण्यात आणल्यानंतर  पोलिसी खाक्या दाखविताच तो पोपटासारखा बोलू लागला व त्याने हा बनावट दरोडा त्याच्या  सहा साथीदारांमार्फत घडवून आणल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्याच्या  सहा साथीदारांचा शोध घेत अवघ्या काही तासातच अजरून संतोष पाडवी (रा.शहादा), योगेश निंबा माळी (रा.कोंढावळ), ज्ञानेश्वर झुलाल सोनवणे, राजू संजू पवार, सुनील इंदास ब्राम्हणे, विशाल मनोज पवार, दिपक छोटू पवार (सर्व रा.सावळदा, ता.शहादा) यांना गजाआड केले. आरोपींकडून  एक लाख चार हजार  489 रुपये व  मोबाईल हस्तगत करण्यात आला. या बनावट दरोडय़ात चालकच घटनेचा सूत्रधार निघाल्याचे उघड झाले. अमित जैन यांच्या फिर्यादीवरुन वरील सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार सादीक शेख हे करीत आहेत.