शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात अतिक्रमण हटावचा मुद्दा पडला मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 11:52 IST

ठराव करूनही उपयोग नाही : जिल्हाधिकाऱ्यांच्या भुमिकेकडे लक्ष कायम

नंदुरबार : शहरातील वाढलेले अतिक्रमण काढण्याचा ठराव पालिका सभेत पाच महिन्यांपूर्वी करण्यात येवून देखील त्याबाबत काहीही हालचाली होत नसल्याची स्थिती आहे. पालिकेने तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत पत्र देखील दिले होते. परंतु त्याचाही उपयोग झाला नसल्याची स्थिती आहे.नंदुरबारातील अतिक्रमणाचा प्रश्न दिवसेंदिवस किचकट होत चालला आहे. असा एकही रस्ता, चौक नाही जेथे अतिक्रमण नाही. यामुळे शहरवासी हैराण झाले आहेत. पालिकेने याबाबत ठराव केलेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना विनंती देखील केली आहे. परंतु कुठलीही हालचाल झालेली नसल्यामुळे आश्चर्य देखील व्यक्त केले जात आहे.अनेक वर्षांपासून प्रलंबीतनंदुरबारातील अतिक्रमणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबीत आहे. पाच वर्षांपूर्वी मोहिम राबविण्यात आली. परंतु केवळ पायरी, ओटे व कच्चे अतिक्रमण काढण्यापर्यंतच ती मर्यादीत राहीली. मोठ्या अतिक्रमणांना हात लावण्याची हिंमत प्रशासनाची झाली नाही. आता सर्वच प्रकारचे लहान, मोठे, पक्के अतिक्रमण काढावे यासाठी मागणी जोर धरू लागली आहे. त्याला कारण नागरिकांना कराव्या लागणाºया अडचणींचा सामना. शहरातील असा एकही रस्ता किंवा चौक नाही जेथे अतिक्रमण नाही. त्यामुळे एखाद्या रस्त्याने चार चाकी वाहन काढणे म्हणजे मोठे दिव्य ठरते.दुचाकी व पायी चालणाºयांनाही समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे आता नागरिकच या अतिक्रमणांना कंटाळलेले आहेत. एकदाचा हा प्रश्न निकाली काढावा यासाठी नागरिकांमधून मागणीला जोर येवू लागला आहे.पालिकेचा ठरावपाच महिन्यांपूर्वी पालिकेने सर्वसाधारण सभेत ठराव केलेला आहे. शहरातील सर्वच भागातील आणि सर्वच प्रकारची अतिक्रमणे काढावी असा तो ठराव आहे. त्याची प्रत जिल्हाधिकाºयांना देखील देण्यात आली आहे.शिवाय पालिकेने स्वतंत्र पत्र लिहून शहरात अतिक्रमण हटाव मोहिम राबवावी अशी मागणी केली आहे. त्या बाबीला आज चार महिने झाले असले तरीही कुणीही फारसे गांभिर्याने घेतले नसल्याची स्थिती आहे.अतिक्रमणाचे सर्व्हेक्षणपालिकेने यापूर्वीच शहरातील सर्व भागातील अतिक्रमणाचे सर्व्हेक्षण केलेले आहे. कुठल्या भागात किती आणि कसे अतिक्रमण आहे याची सर्व माहिती पालिकेने तयार केली आहे. जिल्हाधिकाºयांच्या आदेशाने अतिक्रमण हटावची मोहिम राबविण्याचे ठरविताच लागलीच संबधितांना नोटीसा देवून १५ दिवसाच्या आत स्वत:हून अतिक्रमण काढण्याचे आवाहन केले जाणार आहे. त्यानंतर प्रत्यक्षात मोहिम राबविली जाणार आहे. परंतु यासर्व बाबीला मुहूर्तच सापडत नसल्याची स्थिती आहे.राजकीय किणारहीअतिक्रमण हटाव मोहिमेला राजकीय किणार देखील राहणार आहे. यातून राजकारण देखील खेळले जाणार आहे. सत्ताधारी आणि विरोधकांचे अनेक ठिकाणी अतिक्रमण आहे. अनेक ठिकाणी विनापरवाणगी बांधकाम झालेली आहेत. मंजुरीपेक्षा अधीकची बांधकामे आहेत. त्यात दुकाने, हॉटेल, शॉपींग सेंटर, घरे यांचाही समावेश आहे. याशिवाय कच्ची अतिक्रमणांमध्ये ठिकठिकाणी टपºया ठेवण्यात आल्या आहेत.अशा टपºयांमध्ये काही ठिकाणी चांगला तर काही ठिकाणी अवैध मद्य विकणे, अवैध मांस विक्री करणे असे प्रकार देखील चालतात. यातून संबधीत भागात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होण्याची शक्यता असते.परंतु याचे ना पालिकेला ना जिल्हा प्रशासनाला सोयरसुतक असल्याचे दिसून येत आहे.