प्रतापपूर गावापासून एक किलोमीटर अंतरावरील पुलाजवळील अचानक वळण रस्ता तयार करण्यात आल्याने समोरून येणाऱ्या दुचाकी वाहनांसह अवजड वाहने अचानक समोरून आल्यामुळे अपघात होत असल्याने आतापर्यंत अनेकवेळा अपघात झाले आहे. नुकताच या वळण रस्त्यावर दोन दुचाकी वाहनांनी ऐकमेकांना धडक दिल्यामुळे रजनीकांत इंदवे (३०) हा युवकांचा जागीच मृत्यू झाला होता, तर राहुल इंद्रजित हा युवक या अपघातात गंभीर जखमी झाला होता. यामुळे वळण रस्त्यावर वारंवार अपघात होत असून, बांधकाम विभागाच्या कामावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सार्वजनिक विभागाने दखल घेऊन वळण रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
उड्या नाल्यावरील पुलांचीही दुरवस्था
उड्या नाल्यावरील पुलांचे कठडे तुटले असल्याने वाहनधारकांना रात्रीच्या वेळी धोकेदायक ठरत आहे. २० फूट खोल नाल्यावरील पुलांचे कठडे तुटले असल्याने भीषण अपघाताची शक्यता आहे. पुलाजवळील रस्त्यावर दुतर्फा काटेरी झाडे वाढले असल्याने वाहने वळण रस्त्यावरून येत असताना पुलाच्या सुरुवातीला कठडे नसल्याने वाहने नाल्यात कोसळल्याची घटना नुकतीच घडली आहे. त्यामुळे पुलाच्या सुरुवातीला कठडे टाकण्यात यावे, अशी मागणीही आहे.