शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भोई समाजाच्या 105 उपवर तरूण-तरूणींनी दिला परिचय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 13:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : शहरात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय भोई समाजाच्या वधू-वर परिचय मेळाव्यात समाजातील 105 उपवर ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : शहरात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय भोई समाजाच्या वधू-वर परिचय मेळाव्यात समाजातील 105 उपवर तरूण-तरूणींनी आपला परिचय करून दिला. यात बहुसंख्य पदवीधर उपवरांचा समावेश होता. दरम्यान काही अपंग उपवरांनीदेखील परिचय करून दिला होता.अखिल भारतीय भोई सेवा संघ नंदुरबार जिल्हा व तळोदा भोई समाज पंच मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील माळी समाज मंगल कार्यालयात रविवारी भोई समाजाच्या राज्यस्तरीय मेळावा घेण्यात आला. या वेळी अध्यक्षस्थानी समाजाचे प्रदेश अध्यक्ष डॉ.हिरामण मोरे होते. कार्यक्रमास आमदार उदेसिंग पाडवी, नगराध्यक्ष अजय परदेशी, पालिकेचे प्रतोद संजय माळी, गटनेते गौरव वाणी, जिल्हाध्यक्ष लक्ष्मण वाडीले, नगरसेवक संजय साठे, माजी जिल्हाध्यक्ष सुपडू खेडकर, नगरसेविका शोभाबाई भोई, योगेश चौधरी, निखीलकुमार तुरखिया, धडगावच्या नगराध्यक्षा सुरेखा मोरे, तळोदा तालुकाध्यक्ष शिवदास भोई, समितीचे अध्यक्ष धनलाल भोई, भूता भोई, हिरकन भोई, अशोक शिवदे, रमेश भोई, राजेश भोई, संजय मोरे, भिकमचंद शिवदे आदी उपस्थित  होते.याप्रसंगी आमदार उदेसिंग पाडवी यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, जिल्ह्यातील भोई समाजाने तळोदा सारख्या आदिवासी भागात राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा घेतल्याने खरोखर कौतुक आहे. तसा भोई समाज इकडे तिकडे भटकंती करून आपला उदर निर्वाह करीत असतो. त्यामुळे खर्चिक रूढी-परंपरांना फाटा देवून समाजानेही या सारखे उपक्रम राबवून सामूदायिक विवाहाचेही आयोजन करण्याचे आवाहन केले. या वेळी समाजाध्यक्ष डॉ.मोरे, नगराध्यक्ष परदेशी, गौरव वाणी यांनीही मार्गदर्शन केले. या राज्यस्तरीय मेळाव्यात संपूर्ण राज्यभरातून आलेल्या जवळपास                    105 तरूण-तरूणींनी आपला           परिचय करून दिला होता. यात बहुसंख्य पदवीधरांचाही समावेश होता. आपल्या परिचयात त्यांनी आपले मूळ गाव, जन्म तारीख, शिक्षण, नोकरी व व्यवसाय याची माहिती करून दिली. काही अपंग तरुणांनीदेखील या वेळी आपला परिचय करून दिला होता.प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष लऋक्ष्मण वाडीले यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.चंद्रकांत भोई, प्रकाश वानखेडे तर आभार रवींद्र वानखेडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी भोई समाजातील विविध संघटना व तरूणांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास राज्यभरातून मोठय़ा प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते. दरम्यान याप्रसंगी समाजातील काही लहान मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले होते. शिवाय आदर्श पुरस्कारार्थ्ीचादेखील सन्मान करण्यात आला होता.शहादा येथील रवींद्र वाडीले हे समाजातील जन्माला आलेल्या नवजात मुलीच्या नावाने राष्ट्रीयकृत बँकेत तीन हजार 100 रूपये ठेव म्हणून ठेवतात. शिवाय अशा दाम्पत्याचा सन्मानही करीत असतात. आता          पावेतो बहुसंख्य मुली आणि दाम्पत्यांचा सन्मान त्यांनी केला आहे. हा उपक्रम ते गेल्या वर्षभरापासून राबवित आहे. त्यांच्या या कार्याचा गौरवदेखील उपस्थित प्रमुख अतिथींच्या हस्ते कार्यक्रमात करण्यात       आला होता. त्यांच्या या उपक्रमाचे समाजातून कौतुकही करण्यात आले होते.