शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

कुपोषण मुक्तीसाठी योजनांची एकत्रीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 12:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कुपोषण कमी करण्यासाठी बालविकास योजनेच्या विविध योजना  व उपक्रम एकत्रितरित्या राबविण्यात यावे. जेणेकरून त्यात समन्वय ठेवता येईल अशा सुचना लोकप्रतिनिधींनी जिल्हा आढावा बैठकीत बोलतांना दिल्या.एकात्मिक बाल विकास सेवा योजनाअंतर्गत जिल्हास्तरीय संनियत्रंण व आढावा समितीची बैठक बुधवारी झाली. यावेळी खासदार डॉ.हिना गावीत, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, आमदार उदेसिंग ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कुपोषण कमी करण्यासाठी बालविकास योजनेच्या विविध योजना  व उपक्रम एकत्रितरित्या राबविण्यात यावे. जेणेकरून त्यात समन्वय ठेवता येईल अशा सुचना लोकप्रतिनिधींनी जिल्हा आढावा बैठकीत बोलतांना दिल्या.एकात्मिक बाल विकास सेवा योजनाअंतर्गत जिल्हास्तरीय संनियत्रंण व आढावा समितीची बैठक बुधवारी झाली. यावेळी खासदार डॉ.हिना गावीत, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, आमदार उदेसिंग पाडवी, जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवाडे, जिल्हा परिषद सभापती हिराबाई पाडवी, महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक बागुल यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात एकात्मिक बालविकास सेवा योजनाअंतर्गत एकुण 12 प्रकल्प कार्यरत आहेत. त्यात एकुण दोन हजार 437 अंगणवाडी केंद्र कार्यरत आहेत. जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याची गरज आहे. सर्व विभागांनी आपली जबाबदारी सुयोग्यरित्या पार पाडली तर कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यास नक्कीच मदत होईल अशी अपेक्षा यावेळी लोकप्रतिनिधींनी व्यक्त   केली.यावेळी विविध विभागांनी माहिती दिली. 2016-17 मध्ये एकुण 132 अंगणवाडी इमारत बांधकामे मंजुर करण्यात आलेली आहेत. ती कामे त्वरीत पुर्ण करण्यात यावी. 2017-18 मध्ये अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील ज्या ठिकाणी अंगणवाडी केंद्रास इमारत नसतील त्या ठिकाणी सर्व इमारत बांधकामाचे प्रस्ताव सादर करून त्या प्रस्तावास प्रशासकीय मंजुरी देण्यात यावी व इमारत बांधकामे करण्यात यावी अशा सुचनाही यावेळी देण्यात आल्या. अंगणवाडी केंद्रातील एकुण एक लाख 45 हजार 606 बालकांपैकी एक लाख चार हजार 97 बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. सर्व वैद्यकीय अधिका:यांनी नियमितपणे दरमहा बालकांची आरोग्य तपासणी करावी. सर्व बालकांना वेळेत अमृत आहार योजनेचे लाभ देण्यात यावे व सर्व अधिकारी, कर्मचारी, पर्यवेक्षीका यांनी मुख्यालयी राहून नियमितपणे काम करावे. अंगणवाडी केंद्रांना बचतगटामार्फत सकस आहार पुरवठय़ाचे संनियंत्रण पर्यवेक्षिका यांनी करण्याच्या सुचना देखील यावेळी करण्यात आल्या.