शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कबुतर तस्करीप्रकरणी नंदुरबारात 5 संशयित चौकशीसाठी ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 10:51 IST

ताप्ती गंगा एक्सप्रेसमधील घटना : नंदुरबार लोहमार्ग पोलिसांची कारवाई

नंदुरबार : ताप्तीगंगा एक्सप्रेसमधून उच्च जातीचे कबूतर घेऊन जाणा:या पाच संशयितांना नंदुरबार लोहमार्ग पोलिसांच्या पथकाने सोमवारी चौकशीसाठी ताब्यात घेतले आह़े रात्री उशिरार्पयत वनविभागाकडून संशयितांची चौकशी करण्याची कार्यवाही सुरु होती़संशयित आरोपी मोहम्मद फजल अन्सारी (60), मोहम्मद  इरफान (45), मोहम्मद सईद कुरेशी (40), मोहम्मद रफीक अहमद मन्सूरी (35), फरकान शेख (25) सर्व राहणार सुरत यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेले आहेत़ नंदुरबार येथील रेल्वे स्थानकावर लोहमार्ग पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली आह़े दरम्यान, ताप्तीगंगा एक्सप्रेसमधून आरोपी 9 विविध पिंज:यांमध्ये उच्च जातीच्या कबुतरांना घेऊन जात असल्याची माहिती मिळाली़ यात साधारणत दोन लाख किंमतीचे 400 कबुतर असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आह़े दरम्यान संशयितांकडून प्राथमिक माहिती घेतली असता कबुतर पाळण्याची आवड असल्याने ते सुरत येथे घेऊन जात असल्याचे संशयितांकडून सांगण्यात आले आह़े लोहमार्ग पोलिसांनी वनविभागाला याबाबत माहिती कळवल्यावर वनविभागाचे वनक्षेत्रपाल मनोज रघुवंशी, वनपाल संजय पाटील व वनरंक्षक कल्पेश अहिरे यांनी आरोपींची चौकशी करीत कबुतरांची पाहणी केली़ दरम्यान, अनेक वेळा सट्टा खेळण्यासाठी तसेच जुगारासाठीही कबुतरांचा वापर करण्यात येत असल्याचा संशय व्यक्त केला जात आह़े त्यामुळे या मागे मोठी टोळी         आहे काय, नेमके कबुतर कोठून आणले याबाबत वनविभागाकडून चौकशी करण्यात येत आह़े दरम्यान, लोहमार्ग पोलीस कर्मचा:यांच्या पथकात एपीएस विकास थोरात, एएसआय जी़एच़ काळे, योगेंद्र मोरे, पुरुषोत्तम खेराटकर, राजेंद्र घोराडे, विवेकानंद माळी इतर कर्मचा:यांचा समावेश होता़वनविभागाकडून रात्री उशिरार्पयत आरोपींची चौकशी व पुढील कार्यवाही करण्यात येत होती़ आरोपींच्या म्हणण्यानुसार कबुतर पाळण्यासाठी घेऊन जाण्यात येत होते तर मग कबुतर इतक्या निर्दयीपणे पिंज:यात तसेच पुठ्ठयामध्ये का कोंबण्यात आले होते? असा प्रश्न उपस्थित होत आह़े त्यामुळे संशयित आरोपी वाईल्ड लाईफ तस्कर असल्याचा अंदाज वनविभागाकडून व्यक्त करण्यात येत आह़े बॉक्समधील बहुतेक कबुतर जखमी झाल्यामुळे त्यांना हालचाल करणेही शक्य नव्हत़ेसहाय्यक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर कबुतर हरयाली तसेच यासारख्या जातीचे आहे काय? याबाबत चौकशी सुरु आह़े प्रथम दर्शनी हे कबुतर शेडय़ुल्ड चारमध्ये मोडत असल्याचे त्यांनी सांगितले आह़े हे कबुतर सुरत येथे विविध ठिकाणी विक्री करण्याच्या हेतून नेले जात असल्याचा संशय व्यक्त होत आह़े दरम्यान, ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडे अजून कुठल्या प्रकारचे पक्षी, प्राणी आहेत काय? या दिशेनही चौकशी केली जात आह़े