शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळ निवारणासाठी भारतीय जैन संघटनेने घेतला पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 12:52 IST

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 29 : दुष्काळ निवारणासाठी भारतीय जैन संघटनेने पुढाकार घेतला असून नंदुरबार जिल्ह्यातही संघटनेचे काम सुरू आह़े जिल्ह्यातील गावांनी आपल्या गावात पाण्यासाठी जेवढे काम करता येईल, तेवढे करा, त्यासाठी संघटनेतर्फे जेसीबी व पोकलेन मशिन विनामुल्य उपलब्ध केले जाईल असे आश्वासन भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथा यांनी येथे ...

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 29 : दुष्काळ निवारणासाठी भारतीय जैन संघटनेने पुढाकार घेतला असून नंदुरबार जिल्ह्यातही संघटनेचे काम सुरू आह़े जिल्ह्यातील गावांनी आपल्या गावात पाण्यासाठी जेवढे काम करता येईल, तेवढे करा, त्यासाठी संघटनेतर्फे जेसीबी व पोकलेन मशिन विनामुल्य उपलब्ध केले जाईल असे आश्वासन भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथा यांनी येथे दिल़े जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसा मुंडा सभागृहात झालेल्या सभेत ते बोलत होत़े जिल्ह्यातील वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या गावांच्या प्रतिनिधींची सभा बीजेएसचे अध्यक्ष शांतीलाल मुथा यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी येथे झाली़  यावेळी आमदार डॉ़ विजयकुमार गावीत, जिल्हाधिकारी डॉ़मल्लीनाथ कलशेट्टी, उपजिल्हाधिकारी अर्चना पठारे, बीजेएसचे जिल्हाध्यक्ष डॉ़ कांतीलाल टाटिया, जिल्हापरिषद सदस्य किरसिंग वसावे, संजय चव्हाण, तहसीलदार नितीन पाटील, शहाद्याचे तहसीलदार मनोज खैरनार, अनिल भामरे, नंदकुमार सांखला, रमेश कांकरिया, अनिल चोरडिया यांच्यासह वॉटर कप स्पर्धेत सहभागी ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामस्थ उपस्थित होत़े यावेळी बोलताना शांतीलाल मुथा यांनी सांगितले की, नंदुरबार जिल्ह्यात यापूर्वी शैक्षणिक चळवळीत योगदान दिले आह़े यात 2 तालुक्यात मूल्यवर्धन उपक्रम राबवला जात आह़े बीजेएसच्या माध्यमातून काही वर्षापूर्वी बीड जिल्ह्यात गाळ काढण्याची कामे सुरू केली होती़ यासाठी तेथे राहिलो होतो़ तब्बल 20 लाख क्यूबेक्स गाळ काढून तो शेतात दिला होता़ आज बीड जिल्ह्यात 37 टक्के पाणीसाठा शिल्लक आह़े दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी पाणी फाउंडेशनने सुरू केलेले प्रयत्न हे कौतुकास्पद आहेत़ अभिनेते आमिर खान यांच्या प्रेरणेने प्रारंभी राज्यात 3 आणि नंतर 30 तालुक्यात वॉटर कप स्पर्धा सुरू झाली़ यातून तेथील गावे जलयुक्त झाली आहेत़ या गावांमध्ये राज्यातील ग्रामस्थांना ट्रेनिंग दिले जात आह़े आजघडीस राज्यातील 75 तालुक्यातील साडेपाच हजार गावांमध्ये ही चळवळ सुरू आह़े यातील 24 तालुके हे दुष्काळग्रस्त आहेत़ नंदुरबार जिल्ह्यात बीजेएस कडून 100 तास जेसीबी आणि 250 तास पोकलेन मोफत देण्यात आले आहेत़ येथील गावांचा उत्साह पाहता कोणत्याही अटीविना त्यांना जेसीबी देण्यात येतील़ गावांमध्ये जेवढी क्षमता तेवढे यंत्रांचा वापर करा, दुष्काळ निवारणासाठी बीजेएस मदतीकरिता मागेपुढे पाहणार नाही़ असेही त्यांनी ठामपणे सांगितल़े  जिल्हाधिकारी डॉ़ मल्लीनाथ कलशेट्टी यांनी नंदुरबार तालुक्यातील 46 आणि शहादा तालुक्यातील 48 गावांमधील वॉटर कप स्पर्धेचा आढावा घेत ग्रामसेवकांना सूचना केल्या़ यावेळी त्यांनी 1 मे रोजी महाश्रमदान कार्यक्रमाची माहितीही उपस्थितांना दिली़ आमदार डॉ़ विजयकुमार गावीत यांनी लोकांना प्रोत्साहन देण्याचं काम भारतीय जैन संघटना आणि पाणी फाउंडेशन करत आह़े लोकांनी यात पूर्णपणे सहभाग दिल्यास गावांमधील पाण्याची समस्या मिटेल असे सांगितल़े