शहरं
Join us  
Trending Stories
1
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
2
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
3
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
4
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
5
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
6
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
7
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
8
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
9
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
10
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
11
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
12
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
13
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
14
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
15
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
16
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
17
भारतीय महिला संघ लॉर्ड्स वनडे जिंकण्यास सज्ज; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज
18
मुंबईची सारा जामसुतकर ठरली ‘चॅम्पियन’
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

युवकांच्या पुढाकाराने खळाळून वाहतोय रंका नाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 12:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : नंदुरबार तालुक्यातील धानोरा येथे पाणीटंचाईच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी ग्रामपंचायतीच्या साथीला 11 युवकांनी योगदान देत रंका नाल्याला वाहते केले आह़े  नाल्यात वर्षानुवर्षे अडकलेला गाळ काढून पात्राची रूंदी आणि खोली वाढल्याने उन्हाळ्यातही नाला खळाळून वाहतो आह़े  पश्चिम पट्टय़ात गुजरात हद्दीला लागून असलेले धानोरा हे नंदुरबार तालुक्यातील बाजारपेठेचे गाव ...

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : नंदुरबार तालुक्यातील धानोरा येथे पाणीटंचाईच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी ग्रामपंचायतीच्या साथीला 11 युवकांनी योगदान देत रंका नाल्याला वाहते केले आह़े  नाल्यात वर्षानुवर्षे अडकलेला गाळ काढून पात्राची रूंदी आणि खोली वाढल्याने उन्हाळ्यातही नाला खळाळून वाहतो आह़े  पश्चिम पट्टय़ात गुजरात हद्दीला लागून असलेले धानोरा हे नंदुरबार तालुक्यातील बाजारपेठेचे गाव आह़े लोकसंख्या वाढीमुळे भौतिक गरजा वाढलेल्या या गावात पाणीटंचाईने दोन वर्षापूर्वी पुरते घेरले होत़े गावातील पाणी योजनेला फेब्रुवारीपासून कोरड पडण्यास सुरूवात होत होती़ गावाला लागून असलेल्या रंका नाल्याचे पाणी आटत असल्याने पाण्यासाठी दाहीदिशा अशी ग्रामस्थांची स्थिती होत होती़ यावर मार्ग काढत गावातील इंद्रधनुष्य फाउंडेशन या संस्थेखाली एकत्र येत गावातील युवक आणि रामदूत सुंदरकांड मंडळ यांच्या पुढाकाराने नाला खोलीकरण उपक्रम लोकसहभागातून राबवण्यात आला़ याअंतर्गत रंका नाल्यात 22 दिवस चार जेसीबीच्या माध्यमातून खोदकाम करून पात्राची रूंदी वाढवण्यात आली़ त्यानंतर पात्रात सात फुटार्पयत खोदकाम करण्यात येऊन गाळ काढण्यात आला़ हा गाळ वाळूयुक्त असल्याने 8 ट्रॅक्टरच्या सहाय्याने त्याची गावाबाहेर विल्हेवाट लावण्यात आली़ गावासाठी असलेल्या या उपक्रमाला लागणारा निधी हा मोठा असल्याने श्री रामदुत सुंदरकांड मंडळ धानोरा यांच्यावतीने प्रत्येक मंगळवारी याबाबतची माहिती ग्रामस्थांना देण्यात येत होती़ यातून वेळावेळी ग्रामस्थांनी आर्थिक सहभाग दिला़ यातून 4 लाख 72 हजार रूपयांची रक्कम उभी राहून नदी खोलीकरण पूर्ण झाल़े यासाठी महेंद्र चित्ते, राहुल चौधरी, सचिन वरसाळे, हिरालाल वरसाळे, उमेश वळवी, जयेश चौधरी, डॉ़ कमलाकर पाटील, सुनील पाडवी, प्रशांत पाटील, आशिष शर्मा, कल्पेश शर्मा, सुनिल पाटील, भिकाभाऊ चौधरी यांनी वेळोवेळी ग्रामस्थांना जलव्यवस्थापनाची माहिती देत हे काम पूर्णत्वास नेल़े गेल्या वर्षी पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात आलेल्या या उपक्रमाचा परिणाम यंदाच्या उन्हाळ्यात जाणवू लागला आह़े युवकांच्या या प्रयत्नांचे जिल्हाधिकारी डॉ़ मल्लीनाथ कलशेट्टी, तहसीलदार नितीन पाटील, कल्पेश पाडवी, मनोज मावची यांनी पाहणी करून कौतूकाची थाप दिली होती़ ग्रामपंचायत सरपंच मनोज पाडवी यांनीही युवकांना धन्यवाद दिले होत़े आजअखेरीस गावालगत वाहणा:या रंका नदीत मोठा जलसाठा टिकून आह़े यातून या भागातील भूजल पातळी उंचावली असून गुरा ढोरांची मोठी सोय झाली आह़े यासोबतच नदी पात्रात दैनंदिन वापराचे पाणी घेण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी होत आह़े