लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील पिंगाणे येथील तिखोरा रस्त्यावर असलेल्या माधव जंगू पाटील यांच्या शेतात मादी बिबटय़ा व त्याच्या चार बछडय़ांचे गेल्या काही दिवसापासून वास्तव्य आढळून येत आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतीकामे ठप्प झाली आहेत. वनविभागाने बिबटय़ांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी शेतक:यांकडून होत आहे.तालुक्यातील गोगापूर, रायखेड, खेडदिगर, अवगे-जुनवणे, औरंगपूर परिसरात बिबटय़ाचे वास्तव्य आढळून येत आहे. पिंगाणे-धुरखेडा दरम्यान पं.स.चे माजी सभापती माधव जंगू पाटील यांच्या शेतात गेल्या काही दिवसांपासून मादी बिबटय़ा व त्याची चार बछडे यांचे वास्तव्य असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. गेल्या महिन्यात दुधखेडा रस्त्यावर दोन बिबटे मोकाट फिरत असल्याचे चित्रीकरण सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. त्यामुळे शेतकरी व शेतमजूर दिवसाही शेतात जाण्यास घाबरत होते. या भागात महिनाभरापासून पाऊस सुरू होता म्हणून शेतातील पिकांमध्ये भरमसाठ तण वाढले आहे. सध्या पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी पिकांच्या आंतरमशागतीची कामे आटोपण्यासाठी धावपळ करीत आहेत. मात्र बिबटय़ांच्या वास्तव्यामुळे शेतमजूर कामे करण्यासाठी येत नाहीत. परिणामी शेतीकामे ठप्प झाली असून वनविभागाने या बिबटय़ांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
बिबटय़ांच्या वास्तव्यामुळे शेतीकामांवर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 12:46 IST