शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

मावा व तुडतुडे रोगांचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 11:07 IST

रांझणी परिसर : आंबाबाग धोक्यात, मार्गदर्शन गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्करांझणी : तळोदा तालुक्यातील सातपुडा पायथ्यालगतच्या परिसरातील रांझणी, गोपाळपूर, पाडळपूर, वरपाडा, प्रतापपूर परिसरात आंबा बागांवर मावा तसेच तुडतुडे रोगाचा प्रादुर्भाव झाला आह़े             परिणामी शेतक:यांमध्ये भितीचे वातावरण आह़े त्यामुळे परिसरात फवारणीला वेग देण्यात आला आह़ेतळोदा तालुक्यात आंबा बागांची संख्या ब:यापैकी आह़े त्यामुळे साहजीकच यातून शेतक:यांना चांगले उत्पादन मिळत असत़े सध्या आंब्यांना चांगलीच पालवी फुटली आह़़े  परंतु मावा व तुडतुडेचा           प्रादुर्भाव आढळून येत असल्याने शेतक:यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आह़े यावर उपाय म्हणून कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार शेतक:यांकडून मोठय़ा प्रमाणावर बुरशीनाशकांची फवारणी करण्यात येत आह़े तळोदा तालुक्यात प्रमुख पिकांबरोबरच आंबा पिकातूनही शेतक:यांची मोठी आर्थिक उलाढाल होत असत़े या परिसरातील आंबा दरवर्षी गुजरात, उत्तर प्रदेश आदी राज्यातील व्यापारी खरेदी करुन देशाच्या कान्याकोप:यात तसेच परदेशातही पाठवत असतात़ परंतु               या बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे आंबा बागांवर नवे संकट ओढावले असल्याचे दिसून येत आह़े त्यामुळे या रोगाच्या प्रादुर्भावाने आंब्याच्या गुणवत्तेत व दर्जावर परिणाम होणार असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े दरम्यान, मावाच्या प्रादुर्भावात किटक हे पानाला चिकटून राहतात़  व रसाचे शोषण करतात़ यामुळे पानातील उपयुक्त रस शोषले जात असून आंब्याची वाढही खुंटत आह़े तसेच तुडतुडे हे करडय़ा रंगाचे पाचराच्या आकाराचे किटक आहेत़ हे पालवीचा रस शोषण करीत असतात़ तसेच तुडतुडे आपल्या अंगातून पातळ व चिकट रंगाचे द्रव सोडत आहेत़  या चिकट द्रवामुळे बुरशीचा प्रादुर्भाव होत आह़े अशा प्रकारे मावा व तुडतुडे रोगाच्या प्रादुर्भावामुळे पिकाची वाढ खुंटली  असून शेतक:यांडून चिंता व्यक्त करण्यात येत आह़े  दरम्यान, या रोगांमुळे उत्पन्नात घट होणार असल्याने शेतक:यांकडून  चिंता व्यक्त करण्यात येत असली तरी या रोगाची  काही शेतक:यांनी तत्काळ दखल घेत बुरशी नाशक फवारणी केली आह़े त्यामुळे  या रोगाचा बराचसा प्रादुर्भाव रोखण्यात यश आले आह़े पिकावर अशा पध्दतीने वारंवार होत असलेल्या रोगाच्या प्रादुर्भावाने कृषी विभागाकडून शेतक:यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येत आह़े