शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

शहादा विभागातील दीड हजार शेतक:यांना मिळणार स्वतंत्र रोहित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 12:51 IST

वीज कंपनी : वीज गळती रोखण्याचा प्रयत्न

बोरद : वीज कंपनीने वीज गळती रोखून कृषीपंपधारक शेतक:यांना वेळेवर वीज पुरवठा करण्यात यावा यासाठी बिरसा मुंडा वीज पुरवठा योजनेंतर्गत स्वतंत्र रोहित्र देण्याची योजना आणली आह़े वीज कंपनीच्या शहादा विभागात प्रथमच 1 हजार 330 शेतक:यांना या लाभार्थीना योजनेचा लाभ मिळणार असून डिसेंबरअखेर शेतशिवारात स्वतंत्र रोहित्र सुरु होणार आहेत़ वीज कंपनीच्या शहादा विभागातील धडगाव, तळोदा, शहादा आणि अक्कलकुवा या चार तालुक्यात 32 हजार कृषीपंपधारक शेतकरी आहेत़ या शेतक:यांना पिकांना पाणी देण्यासाठी करण्यात येणा:या वीज पुरवठय़ाबाबत अडचणी येत होत्या़ कृषीपंपांसाठी दिलेले रोहित्र नादुरुस्त झाल्यास शेतक:यांना पिकांचे संगोपन करण्यात अडचणी येत होत्या़ जादा क्षमतेचा रोहित्र देताना कंपनीकडून वेळ लावला जात होता़ यावर मार्ग काढत बिरसा मुंडा योजनेतून स्वतंत्र रोहित्र आणि वीज खांब देण्याची तयारी गेल्या काही महिन्यापासून वीज कंपनीने चालवली होती़ यातून शहादा तालुक्यात 742, तळोदा 409, अक्कलकुवा 172 तर धडगाव तालुक्यात 7 असे एकूण 1 हजार 330 कृषीपंपधारकांची निवड करण्यात आली असून त्यांना स्वतंत्र खांब आणि रोहित्र देण्यात येणार आह़े यामुळे या शेतक:यांना नियमित दाबाने वीज उपलब्ध होणार असून वीज गळती थांबणार आह़े या कामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार असून रोहित्रावर साधारण 15 हॉर्सपावरची मोटार सुरळीतपणे सुरु राहणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े वीज कंपनीकडून सुरु करण्यात येत असलेल्या या कामाबाबत शेतक:यांनी समाधान व्यक्त केलेआह़े