शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

तीन फीडरद्वारे होणार स्वतंत्र वीजपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 13:09 IST

तळोद्यात काम अंतिम टप्य्यात : खंडित पुरवठय़ाची समस्या कमी होणार, नागरिकांना दिलासा

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 5 : वीज वितरण कंपनीच्या येथील कार्यालयाशेजारी उभारलेल्या 33 के.व्ही. केंद्रातील तीन  स्वतंत्र फीडरच्या विभागणीच काम हाती घेतले असून यामुळे शहरातील वेगवेगळ्या भागात स्वतंत्र वीजपुरवठा होणार आहे. साहजिकच खंडित वीजपुरवठय़ाची कटकट कमी होवून जवळपास साडेचार हजार ग्राहकांना दिलासा मिळेल. मात्र आता पावसाळ्यापूर्वी त्याचे काम पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.              शहरातील चार हजार 600 वीज ग्राहकांना घरगुती व व्यावसायिक वीजपुरवठा उपलब्ध करुन देण्यासाठी वीज वितरण कंपनीने आपल्या कार्यालयालगतच 33 के.व्ही. उपकेंद्र उभारले आहे. परंतु या केंद्रावर केवळ पाच एम.व्ही. क्षमतेचा ट्रान्सफार्मर बसविल्यामुळे ग्राहकांना सतत  तांत्रिक बिघाडाला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे वीजपुरवठादेखील खंडित होत असे. या पाश्र्वभूमीवर शहरातील वीजपुरवठा स्वतंत्र करण्याची मागणी केली जात  होती. या अनुषंगाने येथील कार्यालयाकडून जिल्हा विकास नियोजन समितीकडे 2016 मध्ये प्रस्ताव पाठविण्यात आला होता. साधारण दीड कोटींचा हा प्रस्ताव होता. हा प्रस्ताव यंदा मंजूर होऊन त्याचे काम कंपनीने हाती घेतले        आहे. तीन स्वतंत्र फीडरचे काम सुरु आहे. शहादा रोडकडील भागासाठी पाच एम.व्ही., कार्यालयाच्या भागाकडे 10 एम.व्ही. तर उर्वरित भागसाठी 10 एम.व्ही. अशी विभागणी करण्यात आली आहे. यामुळे आता स्वतंत्र वीजपुरवठा          केला जाणार आहे. शिवाय तांत्रिक बिघाड व सततच्या खंडित वीजपुरवठय़ापासून ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. कारण पूर्वी एका ठिकाणी जरी तांत्रिक बिघाड झाला तरी दुरूस्तीसाठी संपूर्ण शहराचा वीजपुरवठा खंडित करावा लागत असे. त्याचबरोबर कंपनीच्या अधिकारी, कर्मचा:यांना नाहक जनतेच्या रोषाला बळी पडावे लागत होते. आता सर्वानाच यातून दिलासा मिळणार आहे. मात्र पावसाळ्यापूर्वी त्याचे काम पूर्ण करून सुरळीत वीजपुरवठा मिळावा, अशी ग्राहकांची मागणी आहे.