वळवी महाविद्यालय, धडगाव
धडगाव येथील महाराज ज. पो. वळवी कला, वाणिज्य व श्री. वि. कृ. कुलकर्णी विज्ञान महाविद्यालयात संस्थेचे संचालक ॲड. के. पी. वळवी यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष हेमंत वळवी, संचालिका सुरेखाबाई पाडवी, बालहक्क समितीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल कदम, आदी उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील यांची क. ब. चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या रासेयो विभागाच्या प्राचार्यांमधून सल्लागार समितीवर निवड झाल्याबद्दल ॲड. के. पी. वळवी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ध्वजसंचलन रोसेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. मनोहर पाटील यांनी केले. कार्यक्रमास प्राध्यापक, कर्मचारी व पालक उपस्थित होते.
विज्ञान महाविद्यालय, अक्कलकुवा
अक्कलकुवा येथील आर.एफ.एन.एस. वरिष्ठ विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागातर्फे वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन प्रकाश पाटील, प्राचार्य डॉ. सी. पी. सावंत, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. भरत पाटील, डॉ. विजय पाटील, सहायक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. राजेश्वरसिंग पाडवी, सहकारी, विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमासाठी डॉ. जुबेर शेख, डॉ. योगेश दुशिंग, प्रा. अंकुश खोब्रागडे, डॉ. विजय पाटील, प्रा.डॉ. मनोज मुधोळकर, प्रा. गोपाल शेंडे प्रा. विनिश चंद्रन, प्रा. गोटू सूर्यवंशी, योगेश महाजन, कांतीलाल पाटील, संदीप पाटील, मनीष पाटील, जगदीश पटेल, नारायण पाटील, प्रशांत पिंपरे, भगवान पाटील, भरत साळवे, दिनेश ईशी, अंकुश ठाकरे, आदींनी परिश्रम घेतले.
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ
शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या विविध विद्या शाखांचा एकत्रित ध्वजारोहण सोहळा मंडळाच्या औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या प्रांगणात झाला. मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. कार्यक्रमास मंडळाचे उपाध्यक्ष जगदीश पाटील, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य, माजी नगरसेवक के. डी. पाटील, शहादा खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन विजय विठ्ठल पाटील, मंडळाचे शैक्षणिक व प्रशासकीय समन्वयक प्रा. मकरंद पाटील, प्राचार्य डॉ. आर. एस. पाटील, प्राचार्य डॉ. एस. पी. पवार, प्राचार्य डॉ. एन. जे. पाटील, प्राचार्य डॉ. डी. एम. पाटील, प्राचार्य डॉ. पी. एल. पटेल, प्राचार्य डॉ. जे. आर. पाटील, प्राचार्य बी. के. सोनी, आदी उपस्थित होते.
माध्यमिक विद्यालय, बिलाडी
शहादा तालुक्यातील बिलाडी त.सा. येथील माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी तंबाखूविरोधी शपथ विद्यार्थ्यांना देण्यात आली. मुख्याध्यापिका सरला पाटील यांनी स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी बलिदान दिल्याचे सांगितले. कार्यक्रमास नरोत्तम शंकर पाटील, सरपंच, ग्रामस्थ, शासकीय कर्मचारी, अंगणवाडी सेविका, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, शिक्षक, कर्मचारी व जि. प. शाळेचे शिक्षक उपस्थित होते.
सातपुडा विद्यालय, वाण्याविहीर
अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहीर येथील श्री सातपुडा वैभव विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालयात संस्थेचे उपाध्यक्ष कीर्तीकुमार पाडवी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष नागेश पाडवी, सचिव प्रभाकर उगले, प्राचार्य दत्तात्रय सूर्यवंशी, माजी उपसरपंच कथ्थुराम सैंदाणे, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख बी. आर. बुवा, सतीश माहेश्वरी, विनोद सैदाणे, सुरेश शिंदे, भावेश सोनार, संतोष बिरारे, उपमुख्याध्यापक बी. जी. भामरे यांच्यासह शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.