नंदुरबार : शहरातील लोकमान्य टिळक विद्यालयात नगरपालिका शिक्षण समिती सभापती नंदा सुरेश जाधव यांनी ध्वजवंदन केले. यावेळी मुख्याध्यापक एम. एस. शेख, एस. एस. भोई, पी.आर. परदेशी, एम. के. अहिरे, आर. जी. सामुद्रे, आर. बी. चौधरी, एच. यू. पाटील, ए. ए. वसावे, सी.एच. बागुल आदी उपस्थित होते.
आश्रमशाळा, मांडवा
मांडवा (देवमोगरा पुनर्वसन), ता. अक्कलकुवा येथील अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत केंद्रप्रमुख हिरालाल शिंपी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी माध्यमिक मुख्याध्यापक एम.व्ही. देसले, प्राथमिक मुख्याध्यापक डी.एन. गोसावी, प्रा.जे.डी. पाटील, ए.टी. वळवी, प्रा. हितेश पटेल, प्रा. प्रवीण बेडसे, प्रा. एस.टी. पाटील, प्रा. एम.ए. दिघे, प्रा. आर.बी. आगळे, एन.आर. जावरे, अविनाश पवार, एन.बी. जाधव, पी. जे. पटेल, एच.आय. गोराने, व्ही. डी. पाडवी, टी. एन. पाडवी, एम.एम. पाडवी, एल.टी. महिंद्रे, सुमित पाडवी, डी.ए. बेडसे, एम.एस. साळुंखे, डी.बी. मोरे, आर.जी. तडवी, ए.एन. जाधव व कर्मचारी उपस्थित होते.
के.आर. पब्लिक स्कूल, नंदुरबार
नंदुरबार येथील के.आर. पब्लिक स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात संस्थेचे चेअरमन किशोरभाई वाणी, सिद्धार्थ वाणी व प्राचार्या डॉ. छाया शर्मा यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. किशोरभाई वाणी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. कार्यक्रमास मोहितसिंग राजपूत, उपप्राचार्य डॉ. नदीम शेख, डॉ.संतोष कुलकर्णी, डॉ. अजिंक्य मोरे, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पदक देऊन गौरव करण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षक विजय बागुल व चंद्रकांत कासार यांचे मार्गदर्शन लाभले. देशभक्ती गीत गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
जाधव शैक्षणिक संकुल, शहादा
शहादा येथील सातपुडा शिक्षण मंडळाच्या कर्मसाक्षी नानासाहेब प्रेमचंद जाधव शैक्षणिक संकुलात माजी उपनगराध्यक्ष इस्माईल मन्सुरी यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यावेळी संस्थेचे सचिव प्रा. संजय जाधव, सोनामाई शिक्षण संस्थेच्या सचिव वर्षा जाधव, समन्वयक संजय राजपूत, माजी प्राचार्य सुनील सोमवंशी, हिमांशू जाधव उपस्थित होते. कार्यक्रमास वसंतराव नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.एन. पाटील, नाईक विद्यालयाचे प्राचार्य एम.बी. मोरे, उपप्राचार्य आर.जे. रघुवंशी, उपमुख्याध्यापक जे.एम. पाटील, पर्यवेक्षक एस. आर. बोरसे, ए.डी. खेडकर, शारदा विद्यालयाच्या प्राचार्य एस. झेड. सय्यद, पर्यवेक्षक एन.बी. कोते, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.शिवाजी माळी व ए.एच. तेलगोटे यांनी केले.