शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

मॅरेज ब्युरोच्या नावाने वाढती फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 12:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बामखेडा : नंदुरबार जिल्ह्यासह लगतच्या दोन्ही राज्यांमध्ये मुला-मुलींच्या संख्येतील वाढत्या असमतोलामुळे शहादा तालुक्यासह जिल्ह्याती युवकांना लगAासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्कबामखेडा : नंदुरबार जिल्ह्यासह लगतच्या दोन्ही राज्यांमध्ये मुला-मुलींच्या संख्येतील वाढत्या असमतोलामुळे शहादा तालुक्यासह जिल्ह्याती युवकांना लगAासाठी विवाह जुळविणा:या संस्थांची मदत घ्यावी लागत आहे. अशा संस्थांकडून संबंधित युवकांसह त्यांच्या पालकांची देखील फसवणूक होत आहे. असा प्रकार थांबविण्यासाठी संबंधित संस्थांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.   गुजरात, मध्यप्रदेश व महाराष्ट्राच्या काही भागातून मुलां-मुलींचे जुळवले जात आहे. त्यात शहादा भागातील युवक देखील विवाहबद्ध होत आहे. परंतु लगA जुळल्यानंतर काही मुलांच्या नातेवाईकांकडे आर्थिक मागणी करीत घटस्फोटाची धमकी देण्याचा प्रकार वाढला आहे, याशिवाय सोन्याची देखील मागणी केली जात आहे. या प्रकारात तथाकथित मॅरेज ब्युरो (लग्न जुळवणा:या संस्था) यांचाही समावेश आहे. जे प्राथमिक नोंदणीची मोठी रक्कम घेत फसवणूक करतात, लग्न झालेल्या युवकांसह त्यांच्या पालकांनाही ताटकळत ठेवतात. हे प्रकार मागील दोन वर्षापासून अधिक वाढले आहे. ज्या युवकांचे काही कारणांमुळे लग्न होतनाही, जुळत नाहीत त्यांना परिसरातील दलालांमार्फत फसविल्याच्या अनेक घटना घडल्या. या प्रकारात दलालांचे देखील समावेश असून त्यांची मोठी साखळी असल्याचे आढळते. घोर फसवणूक होत असली तरी बदनामीच्या भीतीपोटी पीडित परिवार कुठलीही तक्रार करण्यास पुढे धजावत नाही, त्यामुळे दलालांनी आपले पाय पसरवले आहे.अशा अनधिकृत व फसवणूक करणा:या वधु-वर सुचक संस्था व दलालांपासून विवाहच्छुक युवक व आपल्या समाजाने जागृत राहावे. या दोन्ही घटकांची योग्य शहानिशा करूनच मुलाचे लगA जुळवण्यासाठी पुढे पाऊल टाकावे, असे आवाहन सामाजिक संस्थाकडून करण्यात येत आहे. मध्यप्रदेशेतील भोपाल, उज्जैन, इंदौर येथे काही खोटे मॅरेज ब्युरो व वधु - वर सुचक मंडळ तथा संस्था आहेत. पुढील फसवणूक टाळण्यासाठी त्यांची चौकशी करीत  शासनामार्फत त्यांच्यावर कार्यवाही करावी, अशी मागणी  पीडित परिवारांकडून करण्यात येत आहे.