लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात पाऊस लांबल्यामुळे रब्बी हंगामाच्या पेरणी क्षेत्रातही वाढ होण्याची शक्यता आहे. शेतक:यांना अपेक्षेनुसार बियाणे उपलब्ध व्हावे, यासाठी कृषी विागामार्फत बियाण्यांच्या मागणीत वाढ केली आहे. खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आला असून नंदुरबार जिल्ह्यातील शेतक:यांनी देखील रब्बी हंगामासाठी तयारी सुरू केली आहे. त्यात चांगला पाऊस झाल्यामुळे रब्बी हंगामात शेती करणा:या शेतक:यांमध्ये भर पडणार असून पेरणीचे क्षेत्र देखील वाढण्याची शक्यता आहे. रब्बी हंगामात शेतक:यांना बियाण्यांची कमतरता भासू नये, यासाठी कृषी विभागामार्फत बियाण्यांच्या मागणीत मोठी वाढ केली आहे. येत्या रब्बी हंगामात नंदुरबार जिल्ह्यातील 85 हजार 700 हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणार असल्याचे गृहीत धरुन मागणी वाढवली आहे. 2016 मधील रब्बी हंगामात 21 हजार 130, 2017 मधील रब्बी हंगामात 24 हजार 726 तर 2018 मधील रब्बी हंगामात 21 हजार 536 इतक्या बियाण्यांची विक्री झाली होती. या तिन्नही वर्षाचा आढावा घेत यंदाच्या रब्बी हंगामात ज्वारीसाठी 26 हजार 500 हेक्टर, गहूसाठी 26 हजार हेक्टर, हरभरासाठी 24 हजार, करडईसाठी 150, मकासाठी चार हजार 100, सुर्यफुलसाठी 200 हेक्टर, बाजरीसाठी 50 हेक्टर, मूगसाठी 100 हेक्टर असे एकुण 85 हजार 700 हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. रब्बी हंगामात पेरणीसाठी लागणा:या बियाण्यांसह खतांच्या मागणीचे नियोजन देखील कृषी विभागामार्फत करण्यात आले असून पेरणी क्षेत्रानुसार खताची मागणीही करण्यात आली आहे.
रब्बी हंगामासाठी जिल्हा प्रशासनाने महाबिजकडूनही बियाणांची मागणी केली आहे. त्यात ज्वारी-689, गहू- सात हजार 280, हरभरा- तीन हजार 456, करडई- सहा, मका- 246, सुर्यफुल- सात, बाजरी- एक, मूग सहा क्विंटल असे एकुण 13 हजार 131 क्विंटलची मागणी करण्यात आली आहे. पाऊस नसताना देखील मागील वर्षी रब्बी हंगामाचे 69 हजार 458 एवढे क्षेत्र होते. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा दोन पटीने पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा पेरणीचे क्षेत्रही वाढण्याची शक्यता जिल्हा कृषी विभागाकडून वर्तविण्यात आली असून त्यानुसार मागणीही वाढवली आहे.