शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

७० जणांच्या चलबिचलतेत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 12:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्रयोगशाळेतून अहवाल येत नाही आणि दुसरीकडे क्वॉरंटाईन होणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : प्रयोगशाळेतून अहवाल येत नाही आणि दुसरीकडे क्वॉरंटाईन होणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील लोकांच्या मनातील चलबिचलता वाढत आहे. शुक्रवारी घेतलेले ४२ स्वॅब आणि शनिवारी घेतलेले २८ स्वॅब असे एकुण ७० अहवालांची प्रतिक्षा लागून आहे. यात रजाळे, नंदुरबार, कन्साई येथील रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींसह जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या स्वॅब अहवालांचा देखील समावेश आहे.नंदुरबारातील कोरोनाग्रस्त सर्व रुग्ण बरे होऊन घरी परतलेले असतांना मुंबई रिटर्न कुटूंबाने जिल्ह्यात पुन्हा कोरनाचा शिरकाव केला. त्यातच सिव्हीलच्या दोन कर्मचाºयांना देखील त्याची लागण झाल्याचे उघड झाले. त्यामुळे कोरोनाचा फैलाव जिल्ह्यात झाला. आढळून आलेल्या नऊ रुग्णांपैकी सात रुग्ण हे मुंबई रिटर्न आहेत. त्यामुळे मुंबईचा कोरोना जिल्ह्यात धुमाकूळ घालत असल्याचे दिसून येत आहे. प्रलंबीत अहवालातून आणखी कितीजण पॉझिटिव्ह निघतात किंवा कसे याकडे लक्ष लागून आहे.अहवालांची संख्या वाढलीशुक्रवारी कोरोना रुग्णाच्या संपर्कातील ४२ जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यांच्या अहवालाची प्रतिक्षा असतांना आणखी २८ जणांचे स्वॅब घेण्यात आले. त्यामुळे एकुण संख्या आता ७० झाली आहे. काहीजण भितीपोटी देखील तपासणीसाठी येत असून स्वॅब घेण्याचा आग्रह करीत आहेत. परंतु कुठलेही लक्षणे नसतांना स्वॅब घेवून संख्या वाढविण्यापेक्षा अशा व्यक्तींची प्राथमिक आरोग्य तपासणी केली जात आहे.नऊ पैकी सात मुंबई रिटर्नकोरोनामुक्तीनंतर जिल्ह्यात आढळून आलेल्या नऊ रुग्णांपैकी सात रुग्ण हे मुंबई रिटर्न आहेत. दोन रुग्ण हे जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी आहेत. मुंबई रिटर्न आलल्यांमध्ये रजाळे, ता.नंदुरबार येथील सहाजण तर मुळचे दत्तवायपूर, ता.शिंदखेडा येथील एकाचा समावेश आहे. दत्तवायपूर येथील रुग्ण मुंबई येथून आल्यावर गावी थांबला, तेथून शहादा तालुक्यातील कन्साई गावी नातेवाईकांकडे गेला.त्रास होऊ लागल्याने त्यांनी स्थानिक ठिकाणी डॉक्टरांकडे तपासणी केल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. त्यात ते पॉझिटिव्ह आढळले. संबधीत कन्साई येथे थांबल्याने प्रशासनाने कन्साई गावात देखील उपाययोजना केल्या आहेत.रजाळे येथील रुग्ण देखील मुंबई येथून आलेले आहेत. त्यांच्या संपर्कातील ते स्वत: सहाजण पॉझिटिव्ह आढळले असून संपर्कातील इतरांचे अहवाल येण्याची प्रतिक्षा आहे. शनिवारी रात्री उशीरा किंवा रविवारी हे अहवाल येणार आहेत. त्यांच्या संपर्कातील अनेकांना आधीच क्वॉरंटाईन करण्यात आलेले आहे. काहींना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.सिव्हीलमध्ये दक्षतासिव्हीलमधील कर्मचाºयांच्या स्वॅबची संख्या देखील वाढविली आहे. दोन रुग्ण रुग्णालयात आढळल्याने ही दक्षता घेतली जात आहे. कर्मचाºयांना आवश्यक त्या सुरक्षेच्या उपाययोजना करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. कर्मचाºयांना हातमोजे व मास्क पुरविले जात आहे. येत्या काळात अधीक लागण्याची शक्यता लक्षात घेता मागणी करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.नवापूर : शहराच्या गुजरात वेशीवर कोरोनाने धडक दिल्याने नवापूर शहराची धकधक वाढली आहे. उच्छल येथील २४ वर्षीय महिलेस कोरोनाची लागण झाल्याने चिंता वाढली आहे. गोमतीपूर (अहमदाबाद) येथून १८ मे रोजी शहरालगतच्या हनुमानफळी उच्छल येथील २४ वर्षीय महिला परतली होती. सावधगिरीचा पवित्रा म्हणून महिलेस घरातच होम क्वॉरंटाईन करण्यात येऊन आरोग्य तपासणी केली जात होती. २२ मे रोजी तापाची लक्षणे दिसून आल्याने महिलेचा स्वॅब घेण्यात आला. त्याचा अहवाल प्राप्त होताच सायंकाळी सहा वाजता तातडीने महिलेस तापी जिल्ह्याच्या मुख्यालयी व्यारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. शहराजवळ रेल्वेस्थानक वसाहतीला लागून उच्छल व त्याचे पाडे आहेत. हनुमानफळी असाच एक भाग आहे. महामार्गाच्या एका बाजूला हनुमानफळी असून त्याच्यासमोरील भागात करंजी खुर्द ग्रामपंचायतीअंतर्गत वाकीपाडा येथील वस्ती असून या प्रकारामुळे तेथील लोकांनी हनुमानफळी व वाकीपाडा दरम्यानचा रस्ता सील केला आहे. महिलेस एक वर्षीय बालक असून त्याचा अहवाल निगेटीव्ह आल्याचे सूत्रांनी सांगितले. महिलेचा अहवाल येताच उच्छल येथील वैद्यकीय यंत्रणा लागलीच कामाला लागली आहे. औषध फवारणी करुन महिलेच्या संपर्कात आलेल्या ११ जणांना तातडीने विलगीकरण कक्षात पाठविण्यात आले आहे. शहरातील रेल्वेस्थानक भागास लागून हा भाग असल्याने स्थानिक प्रशासनाकडूनही घटनेची दखल घेत आवश्यक पावले उचलली जात आहेत.