शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

निर्णय प्रक्रियेत महिलांचा टक्का वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 12:33 IST

लेवा पाटीदार गुजर समाज अधिवेशन : विविध विषयांवर चर्चा, अनेक ठरावांना सर्वानुमते संमती

प्रकाशा : कुटुंबासह समाजाच्या जडणघडणीत महिलांची भूमिका महत्त्वाची ठरत असते. त्यामुळे मुलगी व सून यात भेद न करता दोघांनाही सारखीच वागणूक द्यावी. समाजाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष दीपक पाटील यांनी रविवारी येथे केले.येथील अन्नपूर्णा माता मंदिराच्या प्रांगणात समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाचे वार्षिक अधिवेशन रविवारी झाले. समाजाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष दीपक पाटील अध्यक्षस्थानी होते. महिला आघाडीच्या अध्यक्षा कमलताई पाटील, जि.प.चे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, जि.प. सदस्य अभिजित पाटील, माधव पाटील, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष राजाराम पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, प्राचार्य मकरंद पाटील, युवा मंचचे अध्यक्ष श्रीपत पाटील, मोहन चौधरी, हरी पाटील,  जयदेव पाटील, माजी नगराध्यक्ष  विजय पाटील, रमेश पाटील, विजय विठ्ठल पाटील, जगदीश पटेल, मोहन चौधरी आदींसह खान्देश, गुजरात, मध्य प्रदेश राज्यातील समाज बांधव व महिला उपस्थित होते. सकाळी साडेआठ वाजता समाजाच्या कार्यकारी मंडळाची बैठक झाली. दीपप्रज्वलनानंतर अन्नपूर्णा माता, स्व.पी.के.आण्णा पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. समाजाचे सचिव सुनील पाटील यांनी अहवाल वाचन केले. धुळे येथील न्या.प्रतीभा पाटील यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे, यशस्वी ठरलेल्यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. समाजाच्या भगिनींच्या ‘ओटय़ावरच्या चर्चा’ या विषयावर माधवी पाटील व महिला मंडळाने नाटिका सादर केली. समाजाच्या विविध अडीअडचणींवर चर्चा झाली. दीपक पाटील म्हणाले की, समाजातील अनिष्ट रुढी परंपरांना पायबंद घालणे, शिक्षण, शेती, व्यवसायाच्या माध्यमातून समाजाची प्रगती व्हावी त्यादृष्टीने सर्वानी प्रय} करावे. समाजसाठीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. परिवारात महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत महिलांना स्थान द्यावे. सकारात्मक बदल घडवून आणण्याची ताकद त्यांच्यात असल्याने त्यांचाही आदर व्हावा. गुजर समाज मंचतर्फे लहान शहादे येथे 10 फेब्रुवारीला  तसेच विविध शहर ग्राम गुजर मंडळातर्फे 20 एप्रिल रोजी प्रकाशा येथे सामुदायिक विवाह सोहळा होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. समाजासाठी तक्रार निवारण समिती, आरोग्य समिती, शेतीविषयक समिती आदीविविध समित्या गठीत करून समाजाला न्याय दिला जाईल, असेही दीपक पाटील यांनी सांगितले. सातपुडा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक पी.आर. पाटील, डॉ.वसंत पाटील, सुभाष पाटील, दीपकनाथ पाटील, मोनालिसा पाटील, डॉ.सविता पाटील,  नुपूर पाटील,  सुदाम पाटील, गोविंद पाटील आदींची भाषणे झाली. प्रास्ताविक सुनील पाटील यांनी केले. सूत्रसंचालन के.डी. पाटील यांनी तर आभार दिलीप ज्ञानदेव पाटील यांनी मानले.