लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहीर : तळोदा-चांदसैली ते धडगाव या घाट सेक्शनच्या रस्त्यावर चादसैली घाटात पावसाच्या संततधारेमुळे मातीचा मलबा झाडाझुडपांसह कोसळून रस्त्यावर पडून राहात असल्याने या घाट सेक्शनच्या रस्त्यावर येणाऱ्या जाणाºया वाहनधारकांना अडचणीचा व त्रासदायक ठरत आहे.सातपुड्याचा घाट सेक्शन तळोदा-चांदसैली व धडगांव या घाट सेक्शन रस्त्यावर चांदसैली घाटात पावसाच्या संततधारेमुळे मातीच्या मलबा झाडाझुडपांसोबत दोन ते तीन ठिकाणी रस्त्यावर मधोमध कोसळून येणाºया -जाणाºया वाहनधारकांना वाहतुकीसाठी अडथळा निर्माण करीत अडचणींचा ठरत आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देवून त्वरित घाट सेक्शनमध्ये उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा वाहनधारकांकडून व्यक्त केली जात आहे. अन्यथा या घाट सेक्शनच्या मार्गावर मोठा अनर्थ घडण्याची दाट शक्यता असून, संबंधितांनी याकडे दुर्लक्ष न करता त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी वाहनधारकांसह या परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
चांदसैली घाटात दरड कोसळल्याच्या घटनांमध्ये वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 12:50 IST