लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 14 : नवापूर एस.टी.आगाराने नांदुरी यात्रेसाठी जादा बसेसच्या नियोजनातून 11 लाख 36 हजार 845 रुपये उत्पन्न मिळविले आहे. आगाराकडून यात्रेसाठी 22 एस.टी. बसेस पाठविण्यात आल्या होत्या. यात्रोत्सवासाठी आगाराकडून खास बसेस उपलब्ध करून घेण्यात आल्या होत्या. या बसेसने एकूण 39 हजार 303 कि.मी अंतर कापून हे उत्पन्न मिळाले आह़े नवापूर आगाराने गत वर्षी पाच हजार कि.मी अंतर पार करून पाच लाख रुपये उत्पन्न मिळाले होते. या वर्षी च्या विक्रमी उत्पन्न वाढीसाठी आगारातील सर्व चालक, वाहक, पर्यवेक्षक, प्रशासकीय कर्मचारी व कार्यशाळा कर्मचारी यांचे आगार व्यवस्थापक राजेंद्र अहिरे यांनी अभिनंदन केले आहे. प्रवाशांना यात्रा सेवेसाठी बसस्थानकात मंडप टाकून बसण्यासाठी खुर्ची व पिण्यासाठी थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. प्रवाशांचे लक्ष वेधण्यासाठी वेळो वेळी ध्वनीक्षेपकाच्या सहाय्याने बस फे:यांची माहिती करुन देत प्रवाशांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरवही करण्यात येत होता़ नांदुरी गडावर जाण्यासाठी एक चांगली व खास सुविधा केल्याने सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी गडावर जाणा:या भाविकांची एसटीच्या माध्यमातुन चांगली सोय झाली होती. प्रवाशांचा असाच प्रतिसाद राहिल्यास पुढच्या वर्षी यापेक्षा जास्त बस गाडया प्रवाशांच्या सेवेसाठी सोडण्यात येतील अशी माहीती आगार प्रमुख राजेंद्र अहिरे यांनी दिली.आगाराने मिळवलेल्या विक्रमी उत्पादनामुळे धुळे विभागातून त्यांचे कौतूक करण्यात येत असून अधिका:यांचा गौरव करण्यात आला़
नवापूर आगाराला नांदुरी यात्रेतून 11 लाखाचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 13:20 IST