शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

तापीवरील २२ उपसा योजना दुरूस्ती न केल्यास बेमुदत उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 11:57 IST

तापीवरील २२ उपसा योजना : संतप्त शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

नंदुरबार : तापीवरील उपसा योजनांच्या दुरूस्तीबाबत शासनाची उदासिन भुमिका आणि अधिकाऱ्यांचा वेळकाढूपणा यामुळे संतप्त शेतकºयांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. येत्या दहा दिवसात योग्य निर्णय न झाल्यास २७ मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा शेतकºयांनी दिला.तापी नदीवर अर्थात सारंगखेडा व प्रकाशा बॅरेज क्षेत्रात एकुण २२ सहकारी उपसा सिंचन योजना आहेत. गेल्या दहा वर्षांपासून तापीच्या बॅरेजसमध्ये पाणी साठा होऊनही केवळ उपसा योजनांच्या नादुरूस्तीमुळे त्या पाण्याचा उपयोग होत नसल्याची स्थिती आहे. याबाबत चार वर्षांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपसा योजना दुरूस्तीसाठी निधीची घोषणा केली होती. त्यानुसार योजनांचे सर्व्हेक्षण देखील झाले. परंतु दुरूस्तीच्या कामांबाबत फारशा हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे दुष्काळात होरपळणाºया संतप्त शेतकºयांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले आणि आपल्या भावना व्यक्त केल्या.यावेळी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यंदा भिषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. शेतीला व पिण्यासाठी पाणी नाही. योजनेच्या लाभ क्षेत्रातील ५९ गावात पिण्याच्या पाण्याची भिषण टंचाई असतांना शासन उदासिन आहे. २२ योजनांच्या लाभ क्षेत्रातील पाईप लाईन दुरूस्ती, व्हॉल्व बदलणे आदी कामांना सुरुवातही नाही. विद्युत पुरवठाच्या कामांना हातही लावलेला नाही. २२ योजनांपैकी केवळ पाच योजनांची अर्धा ते एक तास पर्यंत पंप चालवून पाण्याची चाचणी घेतल्यानंतर पुढील कार्यवाही थंड बस्त्यात आहे. या कामांबाबत प्रशासन आणि अधिकारी यांच्या पातळीवर भिषण उदासिनता आहे.संबधीत अधिकाºयांकडून शासनाकडून निधी उपलब्ध होत नाही व पुढील कामांना मंजुरी नसल्याने कामे होऊ शकत नाही असे उत्तरे दिली जातात. शासन आदेशानुसार केवळ उपसापंप ते मुख्य जलकुंभापर्यंत पाणी काढण्याचे आदेश असल्याचे अधिकारी सांगतात. पुढील काम शेतकºयांचे असल्याचे सांगितले जाते. वास्तविक लाभ क्षेत्रातील प्रत्येक पाणी वाटप चेंबरपर्यंत दुरूस्ती आवश्यक आहे.पंतप्रधानांनी दुष्काळी भागासाठी दोन हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले आहे. त्यातील काही रक्कम या योजनेसाठी वापरावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे.यासंदर्भात ठोस निर्णय न झाल्यास २७ मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा देखील या निवेदनात देण्यात आला आहे.यावेळी ५९ गावातील लाभ क्षेत्रातील शेतकरी उपस्थित होते.