शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: गळफासासाठी वापरलेली साडी आणि पंखा ७१ किलो वजन पेलू शकतो का?
2
सैनिकांचे मृतदेह, युद्धकैद्यांची अदलाबदल,...; रशिया-युक्रेन यांच्या शांतता बैठकीत काय ठरलं?
3
३.५ किलो सोने, २ किलो चांदी अन् १ कोटी रोकड...: IRS अधिकाऱ्याच्या घरी सापडलं घबाड
4
NEET PG 2025 Exam: नीट परीक्षा पुढे ढकलली, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एनबीईएमएसचा मोठा निर्णय
5
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
6
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
7
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
8
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
9
भारताशी गद्दारी करणाऱ्या रवी वर्माच्या पाेलीस काेठडीत वाढ; वकिलाचा कोर्टात भलताच दावा
10
Thane Water Cut: ठाणेकरांनो लक्ष द्या! 'या' दिवशी १२ तास शहरातील पाणीपुरवठा राहणार बंद
11
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा
12
पहाटे तीन वाजताच एटीएसची छापेमारी; ISIS चा म्होरक्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई
13
जोतिबाला गेला अन् वाट चुकला...शेवटचा काॅल भावाला केला; परळीच्या तरुणाची लातुरात आत्महत्या
14
'ऑपरेशन सिंदूर'नंतर परदेश दौऱ्यावर गेलेलं शिष्टमंडळ परतल्यावर PM नरेंद्र मोदींंना भेटणार
15
Women's ODI World Cup 2025 : शेड्यूल ठरलं! पण पाकमुळं 'फायनल' भारतात होणार की, बाहेर हा प्रश्न उरला
16
Ajit Pawar: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवार म्हणाले, "आमची विचारधारा वेगवेगळी असली तरी…"
17
रिंकू सिंहची होणारी पत्नी खासदार, किती आहे तिची संपत्ती...; डोळ्यांवर विश्वास बसणार नाही...
18
सत्यजित तांबेंचे विधान बालिशपणाचे, काँग्रेसने त्यांना...; बाळासाहेब थोरातांनी फटकारले
19
शिलाँगला हनिमूनसाठी गेलेल्या राजाचा मृतदेह सापडला; सोनम अद्याप बेपत्ताच...
20
पाटण्याहून उड्डाण केलेल्या विमानाला गिधाडाची धडक, रांचीत इमर्जन्सी लँडिंग; 4000 फूट उंचावर अडकला होता 175 जणांचा जीव

प्रकाशा घाटावर विसर्जनाला बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 13:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : गणेश विसर्जनासाठी गेल्यावर्षापर्यंत गजबजणारा प्रकाशा ता़शहादा येथील तापीघाट बुधवारी सुनासुना होता़ पाचव्या दिवशी प्रकाशा ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : गणेश विसर्जनासाठी गेल्यावर्षापर्यंत गजबजणारा प्रकाशा ता़शहादा येथील तापीघाट बुधवारी सुनासुना होता़ पाचव्या दिवशी प्रकाशा गावातील मंडळे वगळता इतर कोणत्याही गणेश मंडळांना प्रवेशबंदी करण्यात आली होती़ यामुळे जिल्ह्यातील विविध मंडळांनी त्यांच्या परिसरातच बाप्पाचे विसर्जन केले़कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा होत आहे़ गर्दी होवून कोरोना संसर्ग होवू नये यासाठी प्रशासनाने मंडळांना आवाहन करत विसर्जन मिरवणूका रद्द करण्याचे सूचित केले होते़ मंडळांनी प्रतिसाद देत मिरवणूका रद्दही केल्या आहेत़ परंतु काही मंडळांकडून मिरवणूका न काढता तापी नदी पात्रात विसर्जन करण्यात येईल अशी शक्यता होती़ यातच प्रकाशा येथे सात रुग्ण आढळून आल्याने ग्रामपंचायतीने ठराव करुन बाहेरगावाहून येणाऱ्यांना बंदी केली आहे़ यातून तापी संगमावरील तापी घाटावर बुधवारी शुकशुकाट असल्याचे दिसून आले होते़ दक्षता म्हणून पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे़दक्षिण काशी म्हणून परिचित असलेल्या प्रकाशा येथे पाचव्या दिवशी गणेश विसर्जनासाठी मोठी गर्दी असते़ भाविकांकडून तापी नदी पात्रात जावून विसर्जन करण्यात येते़ यासाठी काही भाविक होड्यांमध्ये जावून विसर्जन करतात़ परंतु यंदा ही परंपरा खंडीत झाली आहे़ कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने ग्रामपंचायतीने ठराव करुन बाहेरगावाहून येणाऱ्यांना मनाई केली आहे़ प्रकाशा ग्रामपंचायतीने गणेश मूर्ती विसर्जनासाठी बाहेरगावाहून कोणीही येवू नये असा ग्रामपंचायत ठराव केला आहे. तसेच पोलिस प्रशासनाने देखील जागोजागी फलक लावत भाविकांना सूचित केले आहे़

४बुधवारी पाचव्या दिवशी प्रकाशा गावातील १५ मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले़ मंडळांनी अत्यंत शांततेत कोणत्याही प्रकारची वाद्य किंवा जल्लोष न करता तापी पात्र विसर्जन केले़ मंडळाचे दोन किंवा तीन सदस्य विसर्जनासाठी उपस्थित होते़ सोबत गौतमेश्वर मंदिराकडील गोमाई नदी पात्रातही मूर्तीचे विसर्जन करण्यात आले़ केदारेश्वर आणि गौतमेश्वर मंदिर परिसरात सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्यासह १६ पोलिस कर्मचारी, दहा गृहरक्षक दलाचे जवान आणि एसीपी प्लाटून तैनात करण्यात आली आहे़४दरवर्षी प्रकाशा येथे शहादा, तळोदा, नंदुरबार, धडगाव शहर आणि तालुक्यातील गणेश मंडळांच्या मूर्ती विसर्जनासाठी आणल्या जातात़ परंतु बुधवारी मात्र येथे एकाही मंडळाने बाप्पाचे विसर्जन केले नसल्याची माहिती देण्यात आली आहे़४प्रकाशा येथे दशामाता, ऋषिपंचमी, गणेश विसर्जनाला बंदी कºणयात आली आहे़ दरम्यान प्रकाशा पंचक्रोशीतील नागरिक अंत्यविधीसाठी प्रकाशा येथे येतात त्यावेळी गर्दी होत असल्याचे दिसून आले आहे़ यामुळे याबाबत निर्णय घेण्याची मागणी प्रकाशा ग्रामस्थांची असून केदारेश्वर येथे स्मशानभूमीत बाहेरच्यांना प्रवेशबंदी करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे़