शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

खेतिया नजीक जनावरांची अवैधरित्या वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 11:27 IST

मध्यप्रदेशातून मोठय़ा प्रमाणात अवैधरित्या जनावरे घेऊन जाणारा ट्रक सिमेलगत असलेल्या नंदुरबारच्या हद्दीत पकडण्यात आला़ यात, 65 गोवंशची सुटका करण्यात आली. शनिवारी-रविवारी मध्यरात्रही ही बाब उघड झाली़ मध्य प्रदेश पोलिसांकडूनही ही कार्यवाही करण्यात आली़ याबाबत सविस्तर वृत्त असे की, राजस्थान येथून महाराष्ट्रात घेऊन जात असलेल्या जनावरांनी भरलेला ट्रक (क्ऱआर.ज़े 09 जी.सी. 7377) ...

मध्यप्रदेशातून मोठय़ा प्रमाणात अवैधरित्या जनावरे घेऊन जाणारा ट्रक सिमेलगत असलेल्या नंदुरबारच्या हद्दीत पकडण्यात आला़ यात, 65 गोवंशची सुटका करण्यात आली. शनिवारी-रविवारी मध्यरात्रही ही बाब उघड झाली़ मध्य प्रदेश पोलिसांकडूनही ही कार्यवाही करण्यात आली़ याबाबत सविस्तर वृत्त असे की, राजस्थान येथून महाराष्ट्रात घेऊन जात असलेल्या जनावरांनी भरलेला ट्रक (क्ऱआर.ज़े 09 जी.सी. 7377) यास  निवाली आरटीओ नाक्यावर थाबविण्यात आल़े परंतु ट्रक चालकाने चित्रपटात शोभावे अशा प्रकारे अडथळा म्हणून लावण्यात आलेले बॅरिकेट्स तोडत सुसाट वेगाने पळ काढला़ काही तरी गडबड असल्याचे लक्षात आल्यावर निवाली पोलिसांनी त्वरित पानसेमल पोलिसांना संपर्क करून सदर ट्रकची माहिती दिली़ या माहितीच्या आधारे पानसेमल पोलिसांनी बंदोबस्त लावून सर्व वाहनाची चौकशी सुरू केली़  नाकाबंदी करुन पोलिसांनी संबंधित ट्रक पकडला़  तपासणी केली असता त्यात लाकडाचे दोन पार्टीशन करून जनावरे कोंबून भरलेली आढळली़ त्यात 17 गाई, 49 बैल जीवंत होते तर, एक बैल मात्र मृत अवस्थेत आढळला़ जनावरांची सुटका करुन त्यांना श्रीकृष्ण गो शाळेत सोडण्यात आल़े गोवंशाची अवैध तस्करी प्रकरणी चाँद मोहम्मद व सादीक खान यांना अटक करण्यात आली आह़े  खेतिया येथे दर शनिवारी आठवडे बाजार भरत असल्याने अशा प्रकारे अवैध वाहतूक नेहमी होत असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आल़े खेतियाकडे जाणा:या वाहनांची पोलीस प्रशासनाकडून बारकाईने तपासणी करण्यात येत होती़ त्यांतर्गत ही कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.