शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

नवापाडात 37 लाखांचा अवैध दारूसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 11:38 IST

नवापूर : नाशिक येथील दारूबंदी व उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शहरानजीक नवापाडा येथे छापा टाकून 37 लाख रुपये किंमतीचा ...

नवापूर : नाशिक येथील दारूबंदी व उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शहरानजीक नवापाडा येथे छापा टाकून 37 लाख रुपये किंमतीचा दारु साठा जप्त केला आहे. तर नवापूर पोलिसांनी केलेल्या कारवाईत 38 हजार रुपयांचा दारुसाठा जप्त करून एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही कारवाईंमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  20 वाहनातून सुमारे 150 अधिकारी व कर्मचा:यांचा ताफा गुरुवारी शहरातील देवळफळी भागातून औद्योगिक वसाहतमार्गे नवापाडाकडे दुपारी तीन वाजेच्या सुमारास रवाना झाल्याने एकच खळबळ उडाली. नवापाडा येथील एका बंद घरात मद्याचा साठा असल्याची गुप्त माहिती असल्याने पथकाने सरळ संशयित ठिकाणी छापा टाकला. तेथून 36 लाख 28 हजार 800 रुपये किमतीचे मॅजीक मोमेंट्स व्होडकाचे 750 मिलीचे 420 खोक्यांमधील पाच हजार 40  बाटल्या व 72 हजार रुपये किमतीच्या फ्लाइंग स्टार व्हिस्कीच्या 120 मिलीच्या 15 खोक्यांमधील  720 बाटल्या असा मद्यसाठा   पथकाने ताब्यात घेतला. विभागीय उपआयुक्त, अधीक्षक, निरीक्षक,  उपनिरीक्षक दर्जाचे वेगवेगळ्या जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचा:यांचा या पथकात समावेश होता. रात्री उशिरापावेतो ही कारवाई सुरु होती. एवढय़ा मोठय़ा संख्येने एवढी वाहने, अधिकारी व कर्मचारी दाखल झाल्याने परिसरात प्रचंड उत्सूकता निर्माण झाली होती. काय कारवाई होते. किती दारूसाठा सापडतो याबाबत उशीरार्पयत नागरिकांमध्ये कुतूहल कायम होते. औद्योगिक वसाहत ते कोठडा मार्गावर दारु विक्री होत असल्याची गुप्त माहिती नवापूर पोलिसांना मिळाल्याने पोलीस पथकाने छापा टाकून अनिल अजरुन मोहिते यास मद्यसाठय़ासह ताब्यात घेतले. घटनास्थळावरुन 38 हजार 400 रुपये किमतीचे रॉयल ब्लू व्हिस्कीच्या 180 मिलीच्या 40 खोक्यांमधील एक हजार 920 बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या. संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात पोलीस नाईक योगेश थोरात यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.