लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अक्कलकुवा पोलीसांनी महामार्गावर गस्तीदरम्यान ८४ हजार रुपयांचे अवैध ताब्यात घेत दोघांना अटक केली़ शनिवारी रात्री ही कारवाई करण्यात आली़शेवाळी-नेत्रंग महामार्गावर अक्कलकुवा पोलीस ठाण्यासमोर शनिवारी रात्री पोलीसांकडून गस्त व वाहनांची तपासणी करण्यात येत होती़ दरम्यान गुजरात राज्याकडे जाणाऱ्या एमएच ०२ एएल ५०५६ हे चारचाकी वाहन अडवून तपासणी केली असता, त्यातील ३८ खोक्यांमध्ये ८४ हजार २४० रुपयांचे विदेशी मद्य आणि बियर मिळून आले़ पोलीसांनी ८४ हजाराचे अवैध मद्य आणि १ जाख ३० हजार रुपयांचे वाहन असा २ लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र सूर्यवंशी यांनी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन सुनील श्रीराम पाटील व कमलेश सुभाष पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे़ ही कारवाई पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचाऱ्यांनी केली़ तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गोविंद जाधव करत आहेत़
अक्कलकुवा येथे वाहनातून अवैध मद्य जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 12:47 IST