शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

गौणखनिजाचे अवैधपणे उत्खनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 12:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यात गौणखनिजाची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असून या गौणखनिजाच्या वाहतुकीने पर्यावरणाचा ºहास होत आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यात गौणखनिजाची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असून या गौणखनिजाच्या वाहतुकीने पर्यावरणाचा ºहास होत आहे. काही ठिकाणी बेकायदेशीररीत्या गौणखनिजाचे उत्खनन सुरू असून यातून शासनाचा महसूल बुडत आहे. महसूल विभागाने गौणखनिज माफियांवर कठोर कारवाई करावी अन्यथा याविरोधात आंदोलन केले जाईल, असा इशारा विविध संघटनांनी दिला आहे.शहादा तालुक्यात १४ गौणखनिज खदाणी आहेत. पैकी डोंगरगाव, सारंगखेडा, वरूळ, कानडी, अनरदबारी, बिलाडी आदी खदाणीतून दगड, मुरूम, खडीचा लिलाव झालेला नाही. परंतु गौणखनिजाची बिनधास्त वाहतूक होत आहे. तसेच परवाना नूतनीकरण केला आहे का? रॉयल्टी भरलेली आहे का? किती ब्रास गौणखनिज काढायचे? चलनप्रमाणे काढले जात आहे का? याबाबतची चौकशी न होता दिवसाढवळ्या महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या नाकावर टिच्चून मनमानी पद्धतीने गौणखनिजाचा अवैधरीत्या उपसा होत आहे. यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे व माफियांचे उखळपांढरे होत आहे. या कामात शासकीय कर्मचारी व अधिकारी यांचा सहभाग असल्याची चर्चा आहे. या गौणखनिजाच्या वाहतुकीने भविष्यात पर्यावरणाचा गंभीर प्रश्न उभा ठाकणार आहे. महसूल विभागाने अवैधरीत्या गौणखनिज वाहतुकीची गंभीर दखल घेऊन गौणखनिजाची वाहतूक थांबविण्याची मागणी होत आहे.वाळू वाहतूकही मोठ्या प्रमाणात होत असून वाळू घाट लिलाव प्रक्रिया झालेली नसताना वाळू येते कोठून आणि जी येत आहे ती अव्वाच्या सव्वा भावाने बांधकामधारकांना घ्यावी लागत आहे. वाळू घाटाची प्रक्रिया अद्याप झालेली नाही. तापी नदीच्या वाळूची थेट नाशिक, मुंबईपर्यंत वाहतूक केली जाते. वाळूचे आगार म्हणून नंदुरबार जिल्ह्याला ओळखले जाते. तापी नदीवर लहान-मोठे मिळून जवळपास १५ पेक्षा जास्त घाट आहेत. या तापीच्या वाळूची मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने अनेक व्यावसायिक या क्षेत्रात उतरुन वाळूच्या ठेक्यासाठी स्पर्धा लागते व पर्यावरणाचे, महसूल विभागाचे कोणतेही नियम, कायदे न पाळता अमर्याद वाळू उपसा केला जातो. यंदा वाळू लिलाव प्रक्रिया अजून झालेली नाही. त्यामुळे शेजारील गुजरातमधील वाळू उपशावरच मदार सुरू आहे. परिणामी वाळूची कृत्रिम टंचाई भासवून वाळूचे भाव वाढवून विक्री केली जात आहे. प्रशासनाने वरील गोष्टींचा विचार करून गंभीर दखल घेऊन अवैधरित्या गौणखनिजाचा होणाºया उपशावर नियंत्रण आणावे अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा विविध संघटनांकडून देण्यात आला आहे. याबाबत शहादा तहसीलदारांना निवेदनही देण्यात आले आहे.