शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग कामात सुरक्षिततेकडे दुर्लक्ष : शहादा ते खेतिया रस्ता रुंदीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 12:23 IST

युवकाच्या मृत्यूनंतरही अधिकारी व ठेकेदाराची डोळेझाक

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 28 : कोळदा ते खेतिया महामार्गाचे ठिकठिकाणी रुंदीकरणाचे काम सुरू आहे. शहादा ते खेतिया दरम्यान होणा:या या कामाच्या ठिकाणी वाहनांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना नसल्याने वाहनधारकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. दरा फाटय़ाजवळ झालेल्या अपघातात युवकाच्या झालेल्या मृत्यूनंतरही संबंधित अधिकारी व ठेकेदार यांनी उपाययोजना न केल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.कोळदा ते खेतिया महामार्गाच्या रुंदीकरण कामाचा शुभारंभ झाल्यानंतर महामार्गासाठी लागणा:या जमिनीची भूसंपादन प्रकियाही शासनाने पूर्ण केली आहे. शहादा तालुक्यातील लोणखेडा, ब्राrाणपुरी, रायखेड, खेडदिगर याठिकाणी महामार्ग रुंदीकरणाला सुरुवात झाली आहे. सध्या प्राथमिक स्तरावर मार्गावरील ठिकठिकाणी छोटय़ा पुलाचे काम, जमिनीचे सपाटीकरण, आवश्यक ठिकाणी भर टाकणे, झाडे तोडणे अशी कामे सध्या सुरू आहेत. महामार्गाचे काम वेगात सुरू आहे ही समाधानाची गोष्ट आहे. मात्र रुंदीकरणाचे काम सुरू असताना जुन्या महामार्गावर वाहतूक मोठय़ा प्रमाणावर सुरू आहे. वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना काम करणारे ठेकेदार किंवा महामार्गाचे काम करणा:या अधिका:यांनी केलेली दिसत नाही. तसेच महामार्गाच्या सपाटीकरणासाठी  मातीने ने-आण करणा:या डंपरमधून मोठय़ा प्रमाणात माती बाहेर उडते. इतर वाहनचालकांसह पादचा:यांना त्यामुळे धोका निर्माण होत आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे, न दिसणारा रस्त्याचा कडा व वाहन चालकांच्या सुरक्षिततेसाठी न केलेल्या उपाययोजना यामुळे शहादा तालुक्यातील पिंगाणे येथील युवकाला आपला जीव गमवावा लागला. काही ठिकाणी झालेले सपाटीकरण तर काही ठिकाणी खोदण्यात आलेले खड्डे, चर यामुळे जुन्या महामार्गाची कडा रात्रीच्यावेळी बरोबर दिसत नाही. महामार्गाचा कडा वाहन चालकाला दिसाव्यात म्हणून लावण्यात आलेल्या मातीच्या गोण्या, रिफ्लेक्टर रात्रीच्या वेळी वाहन चालकांना दिसत नाही. त्यामुळे महामार्ग कुठे संपतो हे दिसत नाही. ही कडा योग्य पध्दतीने दिसावी तसेच येथून जाणा:या वाहनांचा सुरक्षित प्रवास घडावा यासाठी ठोस उपाययोजना करण्यासाठी ठेकेदाराबरोबर  प्रशासनाचे अधिकारी उदासीन दिसत असून प्रभावी उपाययोजना न केल्यास भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.