शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कामांमध्ये दिरंगाई केल्यास कारवाईचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 12:53 IST

नंदुरबार : बारा गाव पाणी योजनेचे भिजत घोंगडे लवकर दूर करा, यापूर्वी राबविलेल्या पाणी योजना बंद असतील किंवा त्यांचा ...

नंदुरबार : बारा गाव पाणी योजनेचे भिजत घोंगडे लवकर दूर करा, यापूर्वी राबविलेल्या पाणी योजना बंद असतील किंवा त्यांचा वापर होत नसेल तर त्या तातडीने सुरू होतील याकडे लक्ष द्यावे. या कामांमध्ये दुर्लक्ष किंवा दिरंगाई करणा:यांवर थेट कारवाई करण्याच्या सुचना आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी नंदुरबार तालुका पाणी टंचाई आढावा बैठकीत बोलतांना दिल्या.यंदा जिल्ह्यात नंदुरबार तालुक्यातील सर्वाधिक गावे ही पाणी टंचाईच्या सावटाखाली आहेत. पूर्व भागातील सर्वाधिक गावांना तीव्र पाणी टंचाई आहे. येत्या काळात अर्थात जानेवारी ते मे दरम्यान या गावांना टंचाईच्या तीव्र समस्येला सामोरे जावे लागणार आहे. ही बाब लक्षात घेता टंचाईच्या कामांचा व उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी पंचायत समिती सभागृहात बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी तहसीलदार नितीन पाटील, गटविकास अधिकारी अशोक पटाईत, पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता पी.टी.बडगुजर, जलसंपदा विभागाचे डी.डी.जोशी आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना आमदार डॉ.गावीत यांनी सांगितले, यंदा अत्यल्प पजर्न्यमानामुळे मोठय़ा प्रमाणावर पाणी टंचाई आहे. नंदुरबार तालुक्यात दरवर्षी पूर्व भाग दुष्काळी असतो. यंदा तर तालुक्यातील सर्वच महसूल मंडळात पाणी टंचाईची तीव्रता आहे. खरीप पिकाची उत्पादकता आधीच घटली, ते पीक वाया गेले. रब्बीचीही जेमतेमच आशा आहे. आता किमान पिण्यासाठी पाणी आणि जनावरांना चारा या दोन बाबींकडे गांभिर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. या दोन्ही कामांबाबत कुणी अधिकारी किंवा कर्मचा:याने दिरंगाई केल्यास कारवाई करावी. बारा गाव पाणी योजना सुरू होण्यात काय अडचणी आहेत. तांत्रिक अडचणी असतील तर त्या कशा सोडविल्या जातील याबाबत संबधीतांनी लक्ष घालावे. भुगर्भातील पाणी पातळी खोल गेली आहे. कुपनलिका, विहिरी आटल्या आहेत. त्यामुळे पर्यायी उपाययोजना देखील स्थानिक पातळीवर होऊ शकणार नाहीत. अशावेळी तापीवरून पाईपलाईनने पाणी आणून अशा गावांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रय} करण्याचे निर्देश देखील आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी        दिले. आजच्या बैठकीत त्यांनी पूर्व व उत्तर भागातील 68 गावांचा आढावा घेतला. प्रत्येक गावातील सरपंच, ग्रामसेवक व संबधीत अधिकारी यांच्याकडून त्या त्या गावांची टंचाईच्या परिस्थितीची माहिती घेतली. काय उपाययोजना          करता येतील यासंदर्भात मार्गदर्शन केले.