शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कुणी घर विकले तर कुणी शेती : नंदुरबारातील बोगस शिक्षकांची नियुक्ती प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 12:32 IST

मनोज शेलार ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कुणी घर तर कुणी शेती विकून शिक्षकाची नोकरी लागणार म्हणून पैसे भरले, कुणाला नोकरी लागली म्हणून लगअ ठरले आता असे पैसे ही गेले व ठरलेले लगअ देखील मोडीत निघण्याची वेळ अनेक युवकांवर आली आहे. अपंग युनिटअंतर्गत जिल्हा परिषदेत शिक्षकाची नोकरी मिळवून देतो म्हणून रॅकेट ...

मनोज शेलार ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कुणी घर तर कुणी शेती विकून शिक्षकाची नोकरी लागणार म्हणून पैसे भरले, कुणाला नोकरी लागली म्हणून लगअ ठरले आता असे पैसे ही गेले व ठरलेले लगअ देखील मोडीत निघण्याची वेळ अनेक युवकांवर आली आहे. अपंग युनिटअंतर्गत जिल्हा परिषदेत शिक्षकाची नोकरी मिळवून देतो म्हणून रॅकेट चालकांनी अनेक युवकांना त्यांच्या कुटूंबियांना हेरून पैसे लाटले. आता रॅकेटमधील कुणीही भेटत नाही आणि मोबाईलही स्विच ऑफ येत असल्यामुळे युवक हवालदिल झाले आहेत.अपंग युनिटअंतर्ग जिल्हा परिषदेत भरती होत असून काम करायचे असल्यास अमूक रक्कम लागेल म्हणून धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील गेल्या दोन ते तीन वर्षापासून सक्रीय असलेल्या रॅकेटने गरजु कुटूंब आणि बेरोजगार युवकांना हेरले. त्यांची मानसिकता करून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले. बोगस कागदपत्रे, नियुक्तीपत्र तयार करून काहींना रूजूही करून दिले. तर काहींचे पैसे घेवून ठेवले. परंतु बिंग फुटल्याने आणि गुन्हा दाखल झाल्याने अनेक युवकांच्या स्वप्न भंगले तर काही कुटूंबांच्या अपेक्षेवर पाणी फेरले गेले आहे.शेती व घर विकलेजिल्हा परिषदेत शिक्षकाची नोकरी मिळत आहे म्हटल्यावर अनेकांनी त्यासाठी तयारी दर्शविली. यापूर्वी ज्यांना नियुक्ती मिळाली त्यांचा अनुभव पहाता काही कुटूंबांनी आपल्याकडे असलेली शेती विकली, काहींनी गहान ठेवली, कुणी घर गहान ठेवले आणि रॅकेटमधील दलालांकडे पैसे भरले.यापैकी 25 ते 30 जणांना नियुक्ती मिळालीही, परंतु पगार काही सुरू होत नव्हता. आज ना उद्या पगार सुरू होईल या अपेक्षेवर असतांनाच गेल्या आठ दिवसांपासून चौकशीचा ससेमिरा आणि त्यानंतर थेट गुन्हेच दाखल झाल्याने असे युवक आता वा:यावर आहेत. त्यांचे कुटूंब पुर्णपणे उध्वस्त झाले असून गुन्हे दाखल होऊन अटक होईल या भितीने संबधीत फरार देखील झाले आहेत.याच युवकांमधून चार ते पाच जणांचे नोकरी लागली म्हणून लगअ देखील ठरले आहे. आता बिंग फुटल्याने लग्न देखील मोडण्याची भिती त्यांच्या कुटूंबियांना सतावत आहे. पैसेही गेले, प्रतिष्ठाही गेली आणि लगअही मोडीत निघाल्याने अशा युवकांची मनस्थितीची कल्पनाही करता येत नसल्याची स्थिती आहे.दलाल गायबरॅकेटमधील ज्या दलालांनी अशा युवकांकडून पैसे घेतले आहेत ते दलाल आता गायब झाले आहेत. त्यांचे फोनही स्विच ऑफ येत आहेत. त्यांना शोधावे तर कुठे, पैसे कसे परत मिळतील यासाठी संबधीत युवक प्रयत्नशील आहेत.युवकच गुन्हे दाखल करतीलज्या युवकांना रॅकेटमधील दलालांनी फसवले आहे असे युवकच आता संबधीत दलालांवर गुन्हे दाखल करण्याची शक्यता आहे. ज्यांना नियुक्तीपत्र दिलेले नव्हते अशा युवकांचे पैसे टप्प्याटप्प्याने परत करण्याची तयारी काही दलालांनी चालविल्याची चर्चाही सुरू आहे.