नंदुरबार : अवैध धंदे बंद झाले म्हणून एकीककडे फौजदाराची कॉलर पकडली जाते तर दुसरीकडे त्याच पोलीस ठाण्यातील कर्मचारी अवैध वाहतूक सुरू ठेवण्यासाठी 800 रुपयांची लाच घेत असल्याचा विरोधाभास अक्कलकुवा पोलीस ठाण्यात घडला. या प्रकाराची पोलीस वतरूळात एकच चर्चा आहे. दोन्ही घटनांविषयी दोन वेगवेगळ्या फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत. अक्कलकुवा येथील यंदाची कालिका माता यात्रोत्सव चांगलाच चर्चेचा ठरला आहे. विशेषत: पोलीस दलाच्य दृष्टीने तो लक्षवेधी ठरला आहे. दोन दिवसात दोन वेगवेगळ्या घटना घडल्याने अक्कलकुवा पोलीस ठाणे चर्चेचा विषय ठरला आहे. पहिल्ी घटना घडली ती बुधवारी सायंकाळी तर दुसरी घटना गुरुवारी दुपारी. पहिल्या घटनेत अवैध धंदे सुरू ठेवण्यासाठी पोलिसाची कॉलर पकडली गेली तर दुस:या दिवशी अवैध वाहतुक सुरू राहावी यासाठी त्याच पोलीस ठाण्यातील कर्मचारी 800 रुपयांची लाच स्विकारतांना पकडला जातो. फौजदारावर आफत..अवैध धंदे बंद केल्याचा राग येवून फौजदाराची कॉलर पकडून धक्काबुकी करणा:यासह त्याला मदत करणा:या दोन अशा तिघांविरुद्ध अक्कलकुवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अक्कलकुवा पोलिसांनी जुगाराचा धंद्यावर कारवाई केली. यात्रेत देखील अवैध धंदे चालू देत नाही याचा राग आल्याने अक्कलकुवा येथील रामस्वरूप उर्फ गजराजसिंग राणा याने फौजदार योगेश सिताराम राऊत यांच्याशी हुज्जत घातली. वरखेडी पुलाजवळील परदेशी गल्लीत त्यांना गाठून कॉलर पकडून धक्काबुकी केली. धंदा बंद कसा करतो तुला पाहून घेतो असे सांगून आरडाओरड केली. तर त्याच्यासोबत असलेल्या कालू उर्फ प्रशांत व भुरू उर्फ प्रितेश यांनी राणा याला दुचाकीवर बसवून तेथून नेण्याचा प्रय} केला. याप्रकरणी फौजदार योगेश राऊत यांनी फिर्याद दिल्याने अक्कलकुवा पोलिसात सरकारी कामात अडथळा आणणे व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार मुकेश पवार करीत आहे.800 रुपयाची लाचयात्रोत्सव काळात प्रवासी वाहतूक करणा:या चारचाकी वाहनचालकाकडून 800 रुपयांची लाच स्विकारतांना अक्कलकुवा पोलीस ठाण्यातील हवालदारास रंगेहात ताब्यात घेतले. अक्कलकुवा येथे कालिका मातेचा यात्रोत्सव सुरू आहे. या यात्रोत्सवात अक्कलकुवा येथील चारचाकी वाहनचालक अवैधरित्या प्रवासी वाहतूक करीत असल्याचे सांगून हवालदार रवींद्र सनसिंग ठाकरे यांनी ठाकरे यांच्याकडे 800 रुपयांची मागणी केली. याबाबत चालकाने नंदुरबार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. चालकाकडून हवालदार ठाकरे यांनी 21 रोजी दुपारी अक्कलकुवा पोलीस ठाणे आवारातच 800 रुपयांची लाच स्विकारली. यावेळी सापळा लावलेल्या पथकाने त्यांना रंगेहात ताब्यात घेतले. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक भिागाचे उपअधीक्षक शिरिष जाधव, निरिक्षक करुणाशील तायडे यांच्यासह पथकाने केली.
फौजदाराची कॉलर पकडली तर हवालदाराने लाच घेतली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 12:06 IST