शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

नंदुरबारला जलसंधारणाच्या कामाचा आदर्श पायंडा

By admin | Updated: May 20, 2017 16:04 IST

गेल्या दोन वर्षापासून जलसंधारणाच्या कामात झोकून दिलेल्या या फाउंडेशनच्या कक्षा लवकरच विस्तारण्यात येणार

ऑनलाइन लोकमतनंदुरबार, दि. 20 - निस्वार्थपणे काम केल्यास मदतीचे हात देखील पुढे येतात. तोच अनुभव येथील पूर्वीच्या सरदार पटेल सोशल ग्रृप व आताचे पी.के.अण्णा फाउंडेशनला आला. गेल्या दोन वर्षापासून जलसंधारणाच्या कामात झोकून दिलेल्या या फाउंडेशनच्या कक्षा लवकरच विस्तारण्यात येणार असल्याची माहिती पदाधिका:यांनी ‘लोकमत’संवाद उपक्रमात  दिली.नंदुरबारच्या पी.के.अण्णा फाउंडेशनच्या पदाधिका:यांनी  ‘लोकमत’ कार्यालयात भेट दिली. यावेळी फाउंडेशनचे पदाधिकारी मुन्ना   पटेल, बाळू पटेल, संदीप पाटील, सुनील पाटील, प्रशांत पटेल व संजय पटेल हे सहभागी झाले होते. कामाला सुरुवातफाउंडेशनच्या उभारणीबाबत बोलताना त्यांनी सांगितले,  2014 मध्ये सरदार पटेल यांच्या रन फॉर युनिटी हा उपक्रम देशभरात राबविण्यात आला होता. त्याचअंतर्गत गिरिविहार परिसरातील काही युवकांनी मिळून कार्यक्रम घेण्याचे निश्चित केले. याच काळात गिरिविहार चौकाचे नामकरण सरदार वल्लभभाई पटेल चौक असे करण्याची मागणी नगरपालिकेकडे करण्यात आली. आमदार चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्षा र}ा रघुवंशी यांनी लागलीच होकार देत चौकाचे नामकरण केले. त्यामाध्यमातून मोठा कार्यक्रमही घडवून आणला गेला. त्यातून प्रेरणा घेत सरदार पटेल सोशल ग्रृपची निर्मिती करण्यात आली. याद्वारे रुग्णवाहिका घेण्याचे निश्चित करण्यात आले. त्याकरीता समाजाच्या 28 गावांमध्ये जावून प्रत्येकी 100 रुपयांची देणगी अर्थात पावती फाडण्यात आली. निधी गोळा झाल्याने त्याचे फाउंडेशन करण्याचे पुढे निश्चित करण्यात आले. त्यानुसार पी.के.अण्णा पाटील फाउंडेशन असे नामकरण करण्यात आले. फाउंडेशनकडे आठ लाख गोळा झाले. अगदी गरिबातील गरिब व्यक्तीनेदेखील सहभाग दिला. कोरीट येथील एका दुकानदारकडे 50 रुपयेच होते, मात्र पावतीवर 100 रुपये छापलेले असल्यामुळे ते कसे द्यावे अशी विवंचना त्याला होती. परंतु त्याचे दातृत्त्व पहाता त्याला साधी पावती देवून त्याचेही योगदान घेण्यात आले. रुग्णवाहिका ना नफा ना तोटा या तत्वावर सुरू आहे. नंदुरबार शहर व तालुका कार्यक्षेत्रात ती मोफत पुरविण्यात येते. फाऊंडेशनतर्फे काहीतरी वेगळे करावे या उद्देशाने पदाधिका:यांनी विचार सुरू केला. जलसंधारणात सहभागगेल्यावर्षी जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता होती. त्यामुळे जलसंधारण क्षेत्रात काम करावे अशी अपेक्षा काहींनी बोलून दाखविली. त्यानुसार पातोंडा गावाची निवड करण्यात आली. या गावातील 1972 मध्ये खोदण्यात आलेल्या तलावात मोठय़ा प्रमाणावर गाळ साचला होता. तो काढावा तसेच दोन चेक डॅममधीलही गाळ काढण्याचे ठरविण्यात आले. या ठिकाणी तीन जेसीबी मशिन व 35 ते 40 ट्रॅक्टरद्वारा गाळ काढण्यात आला. या ठिकाणी काम करणा:या लोकांना जेवनाचा डबा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ग्रामस्थ स्वयंस्फूर्तीने करीत होते. कोळदा येथे दोन व शिंदे येथे तीन चेक डॅम मधील देखील गाळ काढण्यात आला. एकुण साडेसात हजार ट्रॅक्टर गाळ गेल्यावर्षी फाउंडेशनतर्फे काढण्यात आला.  लोकांनी व्यक्त केलेला विश्वास सार्थकी लावण्यासाठी फाउंडेशनचे पदाधिकारी परिश्रम घेणार आहेत. यापुढे कार्यक्षेत्राचा विस्तार करून विविध कामे त्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचेही फाउंडेशनच्या पदाधिका:यांनी यावेळी स्पष्ट केले.